शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार! वयाच्या उल्लेखावर म्हणाले, ‘गांभीर्याने घ्यायची…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar criticize on ajit pawar age jibe mla disqualification maharashtra poltics mva seat sharing delhi
sharad pawar criticize on ajit pawar age jibe mla disqualification maharashtra poltics mva seat sharing delhi
social share
google news

Sharad Pawar Criticize Ajit Pawar : राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीते नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख पुन्हा एकदा केला होता. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी केलेल्या वयाच्या उल्लेखावर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता नाही असे मला वाटतं. तसेच त्यांना (अजित पवारांना) गांभीर्याने घेण्याची गरज नाही,त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे शरद पवार म्हणालेत. (sharad pawar criticize on ajit pawar age jibe mla disqualification maharashtra poltics mva seat sharing delhi)

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्या वयाच्या उल्लेखावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी (अजित पवार) काय बोलाव यावर मी फारस काही बोलत नाही. पण अशाप्रकारे वयाचा उल्लेख करण त्यांना योग्य वाटत असलील तर ते करू शकतात, असे शऱद पवार म्हणालेत.

हे ही वाचा : Mla Disqualification : ठाकरे संतापले! निकालाआधीच नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात

आता माझ्या बाबतीत विचार करायचा झाला तर पार्लमेंट्री कॉन्टेस्टमध्ये 1967 साली आलो. या दरम्यान मी एक दिवसाचाही ब्रेक घेतला नाही, कधी विधीमंडळ तर कधी देशाच्या संसदेत मी काम केले. या सगळ्या काळात आमच्या काम करण्याच्या पद्धतीवर विरोधकांनी कधी फार विषय काढले नाही. प्रश्न वयाचा आणि कार्यकतृत्वाचा असेल तर अनेक गोष्टी सांगता येतील. पण अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता नाही असे मला स्वत: ला वाटतं, असे शरद पवार यांनी सांगितले.

हे वाचलं का?

दरम्यान अजित पवारांनी शरद पवार यांचे वय काढत त्यांनी मार्गदर्शन करावं असा सल्लाही दिला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, माझा राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षांनी संपणार आहे. आणी मी यावर आधीच म्हटलं होते की, मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. एकदा जाहिर केल्यानंतर पुन्हा तो मुद्दा काढण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांना (अजित पवारांना) गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, त्याकडे दुर्लक्ष कराव, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हे ही वाचा : आधी Love Marriage केलं, नंतर ‘तो’ आयुष्यात आला अन्…; हत्येची Inside Story

अजित पवार काय म्हणाले?

वय झाल्यानंतर थांबायचा असतं, पण काही काही जण ऐकायला तयार नाहीत हट्टीपणा करतात, असा हल्ला अजित पवारांनी शरद पवारांवर चढवला आहे. तसेच आम्ही कुठे चुकलो तर सांगाना आम्हाला, आम्ही आहोत ना करायला, असे देखील अजित पवार (Ajit pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) उद्देशून म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

‘वय झाल्यानंतर थांबायचा असतं, पण काही काही जण ऐकायलाच तयार नाही, हट्टीपणा करतात, असा हल्ला अजितदादांनी शरद पवारांवर चढवला. राज्य सरकारमध्ये 58 व्या वयात अनेकजण रिटायरमेंट घेतात. काही जण 65 ला, वयाच्या सत्तरीला किंवा 75 तरीला रिटायर होतात. पण इकडे वय 80- 84 झालं तरी माणूस रिटायर होईना.अरे काय चाललंय काय, असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच आम्ही आहोत ना करायला, आम्ही कुठे चुकलो तर सांगाना. आमच्यात तशी धमक आणि ताकद आहे. पाच पाच सहा सहा वेळा आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT