…म्हणून नवाब मलिक जेलमध्ये, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar on Nawab Malik : मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे.या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांनी खार दुर्घटना, पुलवामा हल्ला, नवाब मलिक यांना अटक अशा सर्व मुद्यावर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तुमच्या खोट्या गोष्टी समाजासमोर मांडतो म्हणून नवाब मलिकला (Nawab Malik) इतक्या […]
ADVERTISEMENT
Sharad Pawar on Nawab Malik : मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे.या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांनी खार दुर्घटना, पुलवामा हल्ला, नवाब मलिक यांना अटक अशा सर्व मुद्यावर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तुमच्या खोट्या गोष्टी समाजासमोर मांडतो म्हणून नवाब मलिकला (Nawab Malik) इतक्या दिवस जेलमध्ये ठेवले असे शरद पवार यांनी म्हणत, सत्याचा गैरवापर सुरू असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
एक कोटी रूपये देणगी अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) शिक्षण संस्थेला इमारत बांधायला दिली,त्यासाठी त्यांना तेरा महिने त्यांना तुरूंगात ठेवले, त्यांच्यावर खटले टाकले, असे शरद पवार (Sharad pawar) यांनी सांगितले. तसेच लोकशाहीमध्ये आज कोणी भूमिका घेऊन पुढे येत असेल, तो आमच्या विचाराचा नसेल तर त्याला आम्ही याचप्रकारे डांबून ठेवू, त्याच्यावर खोट्या केसेस टाकू, हे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घटनेचा दिसून आल्याचे पवारांनी नमूद केले.
हे ही वाचा : “निवडणुकीमुळे…”, 14 श्री सदस्यांच्या मृत्यूवरून शरद पवार संतापले, शिंदेंवर घणाघात
आमचे सहकारी नवाब मलिक (Nawab Malik) किती दिवस जेलमध्ये आहेत. दर 15 दिवसांनी बातमी येते तारीख बदलली. आता बातमी आली मेच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी आहे. दीड- दीड वर्ष एका लोकप्रतिनिधिला जेलमध्ये ठेवले जाते,असे पवार यांनी सांगितले. केवळ राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे, आणि सरकारच्या खोट्या गोष्टी समाजासमोर मांडतो,म्हणून नवाब मलिकला इतक्या दिवस जेलमध्ये ठेवले असल्याचे पवार यांनी सांगितले. शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याबाबत देखील तेच झाले. त्यांच्यावर समन्सची केस, त्या केसला काय अर्थ नाही. पण तरीही त्यांना तुरुंगात ठेवले गेले असे पवार म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या बैठकीचे अजित पवारांनाच नाही निमंत्रण? नेमकं कारण काय?
दरम्यान ही सगळी उदाहरणे हेच सांगतात की राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. आमच्या विरोधात मत मांडणाऱ्यावर कडक कारवाई करणार,अशी यांची भूमिका आहे. हे राज्य, हे देश, आम्ही म्हणू त्या पद्धतीने चालला पाहिजेस ही भूमिका घेऊन देशाचे राजकारण सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
खारघर दुर्घटनवर काय म्हणाले?
नवी मुंबईच्या खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या घटनेवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच आक्रामक झाले आहे. शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया देत निवृ्त्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच खारघर दुर्घटनेची जबाबदारी सरकारची असल्याची टिका देखील शरद पवार यांनी केली.शरद पवार मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT