अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत: शरद पवारांच्या ‘नागालँड मॉडेल’ची चर्चा
शपथविधीनंतर अजित पवार यांनी जर आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत जाऊ शकतो, तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही महाराष्ट्रातही भाजपसोबत जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या नागालँड मॉडेलची चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरबार हॉलमध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी या नेत्यांना शपथ दिली आहे. या शपथविधीनंतर अजित पवार यांनी जर आम्ही नागालँडमध्ये भाजपसोबत जाऊ शकतो, तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही महाराष्ट्रातही भाजपसोबत जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या नागालँड मॉडेलची चर्चा रंगली आहे. आता नेमका हा नागालँड मॉडेल काय होता? हे जाणून घेऊयात. (sharad pawar nagaland model where ncp support ndpp bjp governmenta ajit pawar maharashtra Politics)
ADVERTISEMENT
अजित पवार काय म्हणाले?
शपथविधीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळेल हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. हा निर्णय जवळपास बहुतेक आमदारांना मान्य आहे. लोकप्रतिनिधींना मान्य आहे. पक्ष सगळा आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. कुठल्याही निवडणुका असतील जे पक्षाचं चिन्ह आहे, नाव आहे, त्याच नावाखाली, चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार असल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली.
‘नागालँडला निवडणुका झाल्या होत्या.. तिथे जे राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले ते सगळे भाजपसोबत गेले. दुसरी गोष्ट काही जण त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप करतील.वास्तविक आम्ही साडेतीन वर्षांपूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..’जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत देखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही..नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही जाऊ शकतो.’असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हे वाचलं का?
नागालँड मॉडेल काय ?
नागालँडमध्ये याचवर्षी विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. या निवडणूकीत 60 जागांच्या विधानसभेत भाजप-एनडीपीपी युतीने 37 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर नेफियू रिओ यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले होते. या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 7 आमदार निवडून आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी भाजप-एनडीपीपी युती सरकारला पाठिंबा जाहिर केला होता. नागालँडच्या हितासाठी मुख्यमंत्री नेफियू रिओ यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. याचसोबत पक्षाने भाजपला पाठिंबा दिला नसून नागालँडचे मुख्यमंत्री जे एनडीपीपी यांच्या सरकारला दिल्याचे स्पष्ट केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT