शरद पवारांचा राजीनामा, राऊतांना बाळासाहेबांची आठवण… तेव्हा नेमकं काय घडलेलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar quitting as party sanjay raut reaction
Sharad Pawar quitting as party sanjay raut reaction
social share
google news

Sharad Pawar quitting as party sanjay raut reaction : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून शरद पवारांची मनधरणी सुरु आहे. या दरम्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.(sharad pawar quitting as party president sanjay raut first reaction)

ADVERTISEMENT

संजय राऊत काय म्हणाले?

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत,अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार

हे वाचलं का?

बाळासाहेब ठाकरे यांनी देखील एका भर सभेत असाच राजीनामा दिला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना राजीनामा देण्यापासून शिवसैनिकांनी अडवलं होते.शिवसैनिकांच्या मनधरणीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा मागे घेतला होता.अशी आठवण संजय राऊत यांनी यानिमित्त सांगितली.ट्विटच्या शेवटी संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास असल्याचे देखील म्हटले आहे.

ADVERTISEMENT

भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे. आता विलंब करून चालणार नाही,असे विधान शरद पवार यांनी करून काही दिवसांपुर्वीच करून पक्षात नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. या विधानालाच घेऊन संजय राऊत यांनी दुसरे ट्विट केले आहे. भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरल्याचे ट्विट देखील संजय राऊत यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शरद पवारांची निवृत्ती : कार्यकर्त्यांचा सभागृहातच गोंधळ, घोषणा मागे घेण्याची मागणी

शरद पवार राजकीय निवृत्तीवर काय म्हणाले?

“कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT