‘बैठकीविषयी मला माहिती…’, अजित पवारांच्या बैठकीवर शरद पवार काय म्हणाले?
Maharashtra Political Latest News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या बैठकीनंतर अजित पवार आमदारांसह राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. या भेटीत आता काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
ADVERTISEMENT
Maharashtra Political Latest News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. या बैठकीनंतर अजित पवार आमदारांसह राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. या भेटीत आता काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सर्व घटनेवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.(sharad pawar reaction on ajit pawar meeting of ncp mla maharashtra politics)
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेता म्हणून विधी मंडळाच्या सदस्याची बैठक बोलावण्याचा त्यांना अधिकार आहे. अशाप्रकारच्या बैठकी ते बोलवत असतात. पण आजचा विषय काय आहे, याची काहीच सविस्तर माहिती नसल्याचे शदर पवार यांनी पत्रकारांना सांगितले आहे. यासोबत यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही. संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. तसेच माझा नगरचा कार्यक्रम याधीच रद्द झाला आहे, तो आज झाला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेली दिले.
या विषयासंबंधी एक बैठक मी 6 जुलैला बोलावली आहे. संघटनेने काही पुर्नरचना, काही बदल करायचे आहेत. तसेच अजित पवार यांनी नवीन लोकांना संधी द्यावी अशी एक सुचना केली होती. या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती, असे शरद पवार म्हणाले आहेत.दादांनी बोलावलेली बैठक आज आहे. कारण विधीमंडळ पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. कारण त्या बैठका त्यांच्यात होतच असतात. तर 6 जुलैच्या बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मी निमंत्रित केले आहे,असे देखील पवार म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटीत यांच्यात दोन गट पडल्याची चर्चेवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत हे अजित पवारांनी सर्वांसमोरच सांगितले होते. आमच्या अधिवेशनाच जाहिर भाषणात त्यांनी सांगितले, विरोधी पक्षावर काम करण्याची इच्छा नव्हती. पण आमदारांनी मागणी केल्यामुळे मी विरोधी पक्षनेते पद स्विकारलं, पण आता मला संघटनेत काम करण्याची संधी द्या. कोणत्याही कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही, असे देखील शरद पवार म्हणाले होते. पण हा निर्णय मी एकटयाने घेत नसतो, सर्वांना विश्वासात घेऊन घेत असतो. त्या सगळ्यांची जी भूमिका लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येतो, असे पवार म्हणाले, तसेट पक्षात काही वाद असेल तर त्यावर 6 जुलैला तोडगा काढू, असे देखील पवार म्हणाले आहेत.
तसेच एखाद्याने मीटींगमध्ये हे मत मांडले, म्हणजे हा निर्णय होत नसतो. त्यासाठी पक्षाची घटना आहे. पक्षाचे पदाधिकारी, विधीमंडळ सदस्य मिळून निर्णय घेऊ असे शरद पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT