ठाकरे गटाचा ‘मारुती’ शिंदेंच्या गोटात; वज्रमूठ सभेपूर्वीच मोठा धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) secretary and MP Anil Desai's close aide Maruti Salunkhe joined Chief Minister Eknath Shinde's Shiv Sena.
Shiv Sena (UBT) secretary and MP Anil Desai's close aide Maruti Salunkhe joined Chief Minister Eknath Shinde's Shiv Sena.
social share
google news

मुंबई : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेपूर्वी शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (UBT) सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मारुती साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. शिंदे यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केले. (Shiv Sena (UBT) secretary and MP Anil Desai’s close aide Maruti Salunkhe joined Chief Minister Eknath Shinde’s Shiv Sena.)

ADVERTISEMENT

मारुती साळुंखे यांची अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख होती. साळुंखे यांच्या रुपाने संघटनेची आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदेंच्या गळाला लागला असल्याची चर्चा आहे. संघटनेची घडी कशी बसवावी, प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. शिंदे वेगळे झाल्यानंतरही संघटनेची नव्याने बांधणी करण्यात मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा : ‘शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव’,ठाकरे गटाची भाजपवर टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीची सलगी खटकली… :

उद्धव ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीशी अतिसलगी करून घेतलेली भूमिका पटत नव्हती. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असेल तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे लक्षात आल्यानेच शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी साळुंखे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘खारघर दुर्घटना पैशाच्या जोरावर…’,संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे, असे म्हणतं मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोबत मिळून संघटना अधिक जोमाने वाढवू असेही निक्षून सांगितले. दरम्यान, साळुंखे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT