NCP : सुप्रिया सुळेंनी थेट मोदींनाच आव्हान दिलं, ‘…तर सिद्ध करा’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

supriya sule direct challenge to pm narendra modi prove to ncp currupt party sharad pawar india today mumbai conclave
supriya sule direct challenge to pm narendra modi prove to ncp currupt party sharad pawar india today mumbai conclave
social share
google news

India Today Conclave Mumbai Sharad Pawar, Supriya Sule : इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चर्चेसाठी उपस्थित होत्या. यावेळी चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही राष्ट्रवादीला नेचरल करप्ट पार्टी म्हणता, आम्ही जर खरचं करप्ट आहोत तर त्यांनी सिद्ध करावे, असे थेट आव्हानचं सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. विशेष म्हणजे मोदींनाच याच मुद्यावरून आव्हान देण्याची सुप्रिया सुळेंची ही दुसरी वेळ आहे. (supriya sule direct challenge to pm narendra modi prove to ncp currupt party sharad pawar india today mumbai conclave)

ADVERTISEMENT

इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की,मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकच गोष्ट विचारावीशी वाटते, जसं ते म्हणतात, ‘ना खाऊंगा, ना खाणे दुंगा’ आणि त्यांनी राष्ट्रवादीला नेचरली करप्ट पार्टी म्हटले. जर आम्ही खरचं करप्ट पार्टी आहोत, तर त्यांनी तपास करून सिद्ध करावे, असे थेट आव्हानचं सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

हे ही वाचा : Sanjay Singh arrested : ‘आप’च्या खासदाराला ईडीने केली अटक! प्रकरण काय?

तसेच जर तुम्हाला करप्ट पार्टी सिद्ध करायंची नसेल, तर भाजप आणि सत्तेतील राष्ट्रवादीच्या गटाने माफीनामा काढावा. ज्यामध्ये सांगाव, आम्ही जे बोललो ते खरं नव्हतं. आम्ही चुकीचे आहोत. आणि आम्ही जे बोललो, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. तसचे राष्ट्रवादीवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, राजकीयदृष्या प्रेरीत होते, असे त्यांनी सांगावेत अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान याआधी देखील नवीन संसदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी करत, पंतप्रधान आव्हान दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला नेचरली करप्ट पार्टी म्हटले होते. यावेळी मोदींनी सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्यासंदर्भात राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. तसेच तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केलेलात. हे दोन नाही तर आणखीण चार देखील आहेत. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, माननीय पंतप्रधानांची जी इच्छा आहे, तुम्ही पुर्ण करून टाका, मी तुम्हाला समर्थन देईन, असे थेट सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एकूणच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी, असे थेट आव्हानच भाजपला देऊन टाकले होते.

हे ही वाचा : Devendra Fadnavis: ‘2019 ला राष्ट्रवादीचं ‘ते’ पत्र माझ्या घरातच टाइप केलेलं..’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT