Tejas Thackeray Dance: तेजस ठाकरेंच्या 'त्या' डान्सवरून टीका, भावासाठी आदित्य ठाकरे आले पुढे!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

तेजस ठाकरेंचा 'तो' डान्स, टीका होताच आदित्य ठाकरे भावासाठी पुढे सरसावले!
तेजस ठाकरेंचा 'तो' डान्स, टीका होताच आदित्य ठाकरे भावासाठी पुढे सरसावले!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत अंबानीच्या संगीत सेरेमनीमध्ये तेजस ठाकरेंचा डान्स

point

तेजस ठाकरेंच्या डान्सवरून आशिष शेलारांची टीका

point

आदित्य ठाकरेंनी केली भावाची पाठराखण

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Tejas Thackeray Dance: मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट हे 12 जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याच निमित्ताने काही दिवसांपूर्वी संगीत सोहळा पार पडला. ज्यामध्ये शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनीही डान्स केल्याचं समोर आलं असून त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. ज्यावरून भाजप नेते आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली. ज्याला आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. (tejas thackeray dance at anant ambani sangeet ceremony aaditya thackeray stepped forward for his brother when criticized replied to ashish shelar)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला जवळजवळ संपूर्ण बॉलिवूडनेच हजेरी लावली होती. एवढंच नव्हे तर जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबर याचाही परफॉर्मन्स यानिमित्ताने ठेवण्यात आला होता. या संगीत सोहळ्यात अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह यांच्यासह अनेक तारे-तारका थिरकले. तर याचवेळी तेजस ठाकरेही हे स्टेजवर परफॉर्म करताना दिसले.

हे ही वाचा>> Sharad Pawar : ''फडवीसांना दिल्लीत जायचंय, राज्यात...'', विधानसभा निवडणुकीआधी पवारांचं मोठं विधान

तेजस ठाकरेंचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून थेट तेजस ठाकरेंना टार्गेट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिष शेलारांचं ट्वीट, तेजस ठाकरेंवर टीका

'जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा"  म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही..

ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत

ADVERTISEMENT

जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही

ADVERTISEMENT

"गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..

तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला...!

हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून
महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झाले. 

असो..
हे नृत्य पण कसे "जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता  त्या तरुणाचे "संजयकाका" महाराष्ट्राला पटवून देतीलच...!' असं ट्वीट करत आशिष शेलारांनी तेजस ठाकरेंवर टीका केली.

भावावर टीका होताच आदित्य ठाकरेंचा शेलारांवर पलटवार..

दरम्यान, आशिष शेलार यांनी जी टीका केली त्या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!

आदित्य ठाकरेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांना तेजस ठाकरेंचा डान्स आणि त्यावरुन केली जाणारी टीका याविषयी विचारण्यात आलं. पाहा यावर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले.
 
तेजस ठाकरेंच्या डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, ' जे नेते (आशिष शेलार) टीका करत आहेत. त्यांची मानसिक समस्या आहे. त्यांचा पक्ष त्यांचंच ऐकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. पण अंबानी कुटुंबीयांसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहे. आमची ही तिसरी पिढी आहे ज्यांची अंबानी कुटुंबीयांसोबत मैत्री आहे. ते आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. त्यामुळे डान्स करण्यात काहीही चूक नाही.. हे लग्नच आहे ना...' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आशिष शेलारांना एक प्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT