CM शिंदेंच्या विश्वासातील ठाण्याचे पोलीस आयुक्त… का दिलं प्रमोशन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Thane Police Commissioner Jayjeet Singh has been promoted
Thane Police Commissioner Jayjeet Singh has been promoted
social share
google news

ठाणे : शिवसेना (UBT) च्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) मारहाणी प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर आलेले ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी कायम ठेऊनच त्यांना अपर पोलीस महासंचालक दर्जावरुन पोलीस महासंचालक दर्जावर पदोन्नती देण्यात आली आहे. सोमवारी (24 एप्रिल) संध्याकाळी त्यांच्यासह अन्य दोघांच्या पदोन्नतीबाबतचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले. (Thane Police Commissioner Jagjit Singh has been promoted)

कोण आहेत जयजीत सिंह? :

जयजीत सिंह 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ऑक्टोबर 2020 मध्येच त्यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्याआधी त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली आहे. तसंच मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक (ADGP) म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मे 2021 मध्ये त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदाची सुत्र हाती घेतली होती.

NCP खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?,. हाती ‘द न्यू BJP’ पुस्तक; म्हणाले…

रोशनी शिंदे वाद अन् उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच समोर आलं होतं. त्यानंतर रोशनी शिंदे यांची तक्रार घेत नसल्याचा आरोप शिवसेना (UBT) कडून करण्यात आला होता. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. यावर शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कार्यालयात उपलब्ध नव्हते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, बिनकामाच्या आयुक्तांनाही मला सांगायचं आहे की पदभार स्विकारताना तुम्ही जी शपथ घेतली त्याच्याशी ही प्रतारणा आहे. त्यांना हटवावं आणि एक कणखर आयुक्त ठाण्यात द्यावे. त्यांचं निलंबन करण्यात यावं किंवा बदली करण्यात यावी अशी मागणीही ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

‘शिंदे सरकार 15 दिवसात पडणार..’, संजय राऊतांच्या दाव्यामागची काय आहे कहाणी?

अन्य पोलिसांना पदोन्नती तर काहींची बदली :

जयजीत सिंग यांच्यासोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पोलीस महासंचालक दर्जावर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला घडलेल्या घटनांनंतर वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. तर निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT