INDIA आघाडीला न विचारता ठाकरेंनी ठरवले 2 उमेदवार, लोकसभेसाठी ‘यांना’ संधी!

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

uddhav thackeray did not wait for the approval of india alliance anil desai and arvind sawant names were finalized for two seats in mumbai
uddhav thackeray did not wait for the approval of india alliance anil desai and arvind sawant names were finalized for two seats in mumbai
social share
google news

Shiv Sena UBT: मुंबई: ठाकरे गटातील शिवसेनेने (UBT)पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू केली आहे. UBT सेनेच्या प्रमुख सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी INDIA आघाडीची जागांबाबत समीकरणं ठरण्याआधीच मुंबईतील दोन जागांवर आपले आपले उमेदवार देखील निश्चित केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. (uddhav thackeray did not wait for the approval of india alliance anil desai and arvind sawant names were finalized for two seats in mumbai)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीसाठी मागील दोन आठवड्यांपासून ‘मातोश्री’वर सुरु असलेल्या बैठकीनंतर अखेर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर पक्ष नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण..

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> ‘राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशावरून’, अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

मात्र दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्याने अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का? असाही विचार पक्षनेतृत्वाकडून सुरु आहे.

एप्रिल 2024 मध्ये अनिल देसाई यांची राज्यसभा खासदारकीची टर्म संपत आहे. तसेच 16 आमदारांच्या संख्येच्या जोरावर देसाईंना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्याबाबत पक्षनेतृत्व साशंक असल्याने अनिल देसाईंना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

…तर प्रियांका चतुर्वेदींनाही मिळणार संधी?

त्याचसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात युवा सेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांनी ऐनवेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दर्शवल्यास सुनील प्रभू किंवा प्रियांका चतुर्वेदी यांच्याही नावावर विचार सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी…’ ठाकरेंची Cm शिंदेंवर जोरदार टीका

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांशी असलेली INDIA आघाडी आता सज्ज झाली आहे. मुंबईत झालेल्या शेवटच्या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांमधील संघर्ष टाळण्यासाठी जागावाटप आणि जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात उद्धव हे मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटापेक्षा पुढे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT