IPL : तेराव्या सिझनमध्ये ठरले फ्लॉप, या हंगामात असेल मोठी जबाबदारी - Mumbai Tak
Mumbai Tak /स्पोर्ट्स / IPL : तेराव्या सिझनमध्ये ठरले फ्लॉप, या हंगामात असेल मोठी जबाबदारी
स्पोर्ट्स

IPL : तेराव्या सिझनमध्ये ठरले फ्लॉप, या हंगामात असेल मोठी जबाबदारी

आयपीएलचा तेरावा हंगाम २०२० मध्ये युएईत पार पडला. जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने युएईत स्पर्धेचं आयोजन केलं. मुंबई इंडियन्सने पहिल्यापासून स्पर्धेवर वर्चस्व कायम राखत आपला दबदबा कायम राखला. फायनल मॅचमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला हरवून पाचवं विजेतेपद मिळवलं. या हंगामात अनेक अनपेक्षित गोष्टीही घडल्या. नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा संघ २०२० मध्ये साखळी फेरीतूनच बाहेर फेकला गेला.

याचसोबत अनेक महत्वाच्या खेळाडूंची २०२० च्या आयपीएलमध्ये कामगिरी अत्यंत खराब झाली. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. पुढील हंगामात महत्वाच्या ५ खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

५) स्टिव्ह स्मिथ (RR) – ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टिव्ह स्मिथच्या क्षमतेवर कोणालाही अविश्वास नसेल. परंतू आयपीएलचा विचार केला असता २०२० हे वर्ष स्मिथसाठी अत्यंत खराब गेलं. २०२० च्या हंगामात पहिल्या दोन सामन्यांमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत स्मिथने दिमाखात सुरुवात केली, मात्र यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याचा सूर हरवला. राजस्थान रॉयल्सचा संघ हा स्मिथवर अवलंबून असतो, अशा परिस्थितीत स्मिथ अपयशी ठरत गेल्यामुळे राजस्थानची गाडीही रुळावरुन खाली घसरली. राजस्थानच्या संघाचं कर्णधारपद स्मिथकडे असल्यामुळे त्याचं अपयश चांगलंच जाणवलं. त्यामुळे पुढील हंगामात स्मिथला संघासोबत आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

४) ऋषभ पंत (DC) – दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने २०२० च्या हंगामात सर्वांना चकीत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. सुरुवातीला चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीची गाडीही मधल्या काळात घसरली होती. सलामीच्या जागेसाठी दिल्लीने अनेक पर्याय वापरुन पाहिले. यात दिल्लीच्या काही खेळाडूंनी आपली चमकही दाखवली, परंतू ऋषभ पंतचं अपयश हे दिल्लीसाठी चिंतेचा विषय बनलं होतं. २०२० मध्ये १४ सामन्यांत पंतने फक्त ३४३ रन्स केल्या. ज्यात अंतिम फेरीत केलेल्या एकमेव हाफ सेंच्युरीचा समावेश होता.

खरं पहायला गेलं तर मधल्या फळीत दिल्लीच्या टीमला ऋषभ पंतकडून अनेक अपेक्षा होत्या. परंतू गरजेच्या वेळी ऋषभ पंत एकदाही या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. याचसोबत विकेटकिपींगदरम्यानही पंतने काही सोपे कॅच सोडले ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर वारंवार टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. त्यामुळे ऋषभ पंतला २०२१ मध्ये आपल्या कामगिरीत सुधारणा करावीच लागणार आहे.

३) दिनेश कार्तिक (KKR) – दिनेश कार्तिक हा आयपीएलमधल्या अनुभवी खेळाडूंपैकी एक…२०२० मध्ये दिनेश कार्तिककडे कोलकाता नाइट रायडर्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतू पहिल्या सामन्यापासून दिनेश कार्तिक आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. कर्णधार, यष्टीरक्षक आणि स्वतः फलंदाजीत चांगली कामगिरी अशी तिहेरी भूमिका दिनेशला निभवायची होती. परंतू आपल्या खराब कामगिरीचा संघावर परिणाम होत आहे हे लक्षात आल्यानंतर दिनेशने कर्णधारपद ओएन मॉर्गनकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

२०२० चा हंगाम ऐन मध्यावर आलेला असताना कोलकाता नाइट रायडर्सने संघात महत्वाचा बदल केला खरं, पण याचं हवं तसं फळ त्यांना मिळालं नाही. प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी KKR ला सनराईजर्स हैदराबादवर अवलंबून रहावं लागणार होतं…आणि ठरल्याप्रमाणे KKR चं स्वप्न धुळीस मिळालं. १४ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने फक्त १६९ धावा केल्या. त्यामुळे पुढील हंगामात आपलं दिनेश कार्तिकला स्वतःला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

२) ग्लेन मॅक्सवेल (KXIP) – किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा २०२० वर्षातला प्रवास हा रोमांचकारक ठरला. पहिल्या सत्रात सलग काही सामने गमावल्यानंतर पंजाब स्पर्धेच्या बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू नंतरच्या सत्रात पंजाबने ख्रिस गेलला संघात स्थान दिलं आणि चमत्कारच झाला. गेलच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने सलग मॅच जिंकण्याचा धडाका सुरु ठेवत मुंबई, दिल्ली यासारख्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं.

लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंह, ख्रिस गेल असे खेळाडू बहारदार कामगिरी करत असताना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचं अपयश पंजाबला चांगलंच भोवलं. २०२० च्या हंगामात मॅक्सवेल फक्त १०८ रन्स काढू शकला. महत्वाची गोष्ट म्हणजे मॅक्सवेल ज्या धुँवाधार बॅटींगसाठी ओळखला जातो त्या पद्धतीची बॅटींग त्याला संपूर्ण सिझनमध्ये जमली नाही. मॅक्सवेल संपूर्ण स्पर्धेत एकही सिक्स मारु शकला नाही, यावरुन पंजाबच्या संघाला मॅक्सवेल फॉर्मात नसणं किती महागात पडलं याचा अंदाज आपल्याला येईल.

१) महेंद्रसिंह धोनी – २०२० चं वर्ष हे भारतीय चाहत्यांसाठी आणखी एका कारणामुळे अतिशय खराब गेलं. संपूर्ण देशवासियांच्या गळ्यातला ताईत असलेल्या धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. यानंतर धोनीने आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला. परंतू इथेही त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सुरेश रैनाची स्पर्धा सुरु होण्याआधीच घेतलेली माघार, प्रमुख खेळाडूंचं फॉर्मात नसणं चेन्नई सुपरकिंग्जचा चांगलंच भोवलं. २०२० वर्षात संपूर्ण सिझनमध्ये धोनीने संघात अनेक बदल केले, ज्यामुळे महत्वाच्या सामन्यांमध्ये CSK ची घडीच बसू शकली नाही. त्यातच वरुण चक्रवर्तीसारख्या नवख्या बॉलरनेही धोनीला आऊट केल्यामुळे धोनीच्या अपयशाची अधिकच चर्चा झाली.

धोनीची खराब कामगिरी पाहता अनेकांनी तो आगामी हंगामात खेळणार नाही, तो आता निवृत्ती घेईल असंही भाकीत केलं होतं. परंतू धोनीने आगामी सिझन खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे २०२१ मध्ये धोनी २०२० मधली कसर भरुन काढेल अशी आशा त्याचे चाहते बाळगून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − 3 =

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!