Neeraj Chopra: 19 व्या वर्षी Army ऑफिसर ते Gold Medal विजेता, कोण आहे नीरज चोप्रा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पानिपत (हरियाणा): भारतीय अॅथलिट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) प्रचंड मोठा इतिहास रचला आहे. ज्या गोल्ड मेडलची (Gold Medal) सर्वजण अनेक वर्षांपासून वाट पाहत होते ते पदक अखेर भारताच्या (India) भालाफेकपटू नीरज चोप्राने मिळवून दिलंच. भालाफेक (javelin throw) स्पर्धेत अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करत नीरजने जगातील सर्व खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. पण सुवर्ण पदकापर्यंतचा त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्यामुळे नीरज चोप्रा नेमका कोण आणि त्याने केलेली मेहनत याबाबत जाणून घेऊयात सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिक 2020 ही भारतासाठी आजवरची सर्वाधिक यशस्वी ऑलिम्पिक स्पर्धा ठरली आहे. कारण या स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदाकासह एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदकांची कमाई केली होती. पण यंदाची स्पर्धा खूपच विशेष ठरली आहे. कारण भारताने पहिल्यांदा ट्रॅक अॅण्ड फिल्ड प्रकारात नीरज चोप्रा याने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. आता जाणून घेऊयात याच ‘गोल्डन बॉय’बद्दल.

हे वाचलं का?

पाहा कशी मिळाली नीरज चोप्राला लष्करात नोकरी…

नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजने चंदीगडमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. पण सुरुवातीपासूनच त्याचा कल हा क्रीडा क्षेत्राकडे होता. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नीरजने ट्रॅक अॅण्ड फिल्डमध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने भालाफेक या खेळाची निवड केली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान, 2016 साली पोलंडमध्ये IAAF वर्ल्ड अंडर -20 चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 86.48 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर 2018 साली झालेल्या कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये देखील नीरजने गोल्ड मेडल पटकावून आपण जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी योग्य उमेदवार असल्याचं दाखवून दिलं होतं. दरम्यान, पोलंडमधील यशानंतर म्हणजे वयाच्या 19व्या वर्षीच त्याची लष्करात कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.

ADVERTISEMENT

लष्करातून नोकरी मिळाल्यानंतर नीरज एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे आणि मी संयुक्त कुटुंबात राहतो. माझ्या कुटुंबात कोणालाही सरकारी नोकरी नाही. म्हणूनच प्रत्येकजण आनंदी आहे. मी. आता मी माझे प्रशिक्षण चालू ठेवू शकतो तसेच माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील करू शकतो.’

यावरुन आपल्या लक्षात येईल की, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना देखील नीरजने आपल्या खेळात खंड पडू दिला नव्हता. कठोर मेहनत आणि जिद्द याच्या जोरावरच त्याने आज अलौकिक असं यश मिळवलं आहे. जे पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.

नीरजने मोडला होता स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम

2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 88.06 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज हा पहिला भारतीय भालाफेकपटू होता ज्याने सुवर्णपदक जिकलं होतं. आशियाई खेळांच्या इतिहासात भारताला आतापर्यंत भालाफेकमध्ये फक्त दोनच पदके मिळाली आहेत. नीरजच्या आधी, गुरतेज सिंगने 1982 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

2018 मध्ये एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर नीरजला खांद्याच्या दुखापतीने ग्रासलं होतं. यामुळे तो बराच काळ खेळापासून दूर राहिला होता. 2019 हे वर्ष तर त्यांच्यासाठी आणखी वाईट होते. तर मागील वर्षातच कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या होत्या.

यानंतर, नीरजने या वर्षी मार्चमध्ये झालेल्या इंडियन ग्रांप्रीमध्ये 88.07 मीटर थ्रो करुन स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. नीरजची आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी होती.

लहान वयातच नीरजने दाखवलेली आपली चमक

23 वर्षीय नीरज चोप्रा हा अंजू बॉबी जॉर्ज हिच्यानंतर जागतिक स्तरावरील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय आहे. त्याने IAAF वर्ल्ड U-20 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2016 मध्ये त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 82.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर 2017 मध्ये त्याने 85.23 मीटर थ्रोसह आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकिट कसं मिळवलं?

नीरज चोप्राने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंग अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपद्वारे ऑलिम्पिक तिकीट मिळवले होते. त्याने 87.86 मीटर भाला फेकून 85 मीटरचे अनिवार्य क्वालिफिकेशन मार्क ओलांडून टोकियोसाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती. त्याने प्रत्येक फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी चालू ठेवली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने आता सुवर्णपदक जिंकले आहे.

Tokyo Olympics 2020: माझं गोल्ड मेडल मिल्खा सिंह यांना समर्पित, मला त्यांना माझं पदक दाखवायचं होतं: Neeraj Chopra

नीरज चोप्राने या वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे झालेल्या इंडियन ग्रांप्रीमध्ये 88.07 मीटर इतका भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर जूनमध्ये लिस्बन येथे आयोजित मीटिंग सिडेड डी लिस्बोआ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत पाच पोर्तुगीज सहभागींमध्ये त्याने केलेली सर्वोत्तम कामगिरी ही 83.18 मीटर भालाफेक होती.

दरम्यान, आता नीरज चोप्राने आपण किती उच्च दर्जाचे अॅथलिट खेळाडू आहोत याची संपूर्ण जगाला ओळख करुन दिली आहे. त्यामुळे यापुढील अनेक स्पर्धांमध्ये नीरज अशीच कामगिरी करत राहो आणि देशाची मान उंचावत राहो याच ‘मुंबई तक’कडून त्याला शुभेच्छा!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT