IPL 2021 च्या उर्वरित सिझनची तयारी सुरु, BCCI ने तयार केले दोन प्लान
Bio Secure Bubble चं आयोजन केल्यानंतरही आयपीएलमध्ये खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचे सामने स्थगित केले. सध्या भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी करतोय. तर दुसरीकडे बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने येणाऱ्या काळात कुठे खेळवता येतील याची तयारी सुरु केली आहे. भारताचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर बीसीसीआय आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवण्याचा विचार […]
ADVERTISEMENT
Bio Secure Bubble चं आयोजन केल्यानंतरही आयपीएलमध्ये खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचे सामने स्थगित केले. सध्या भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तयारी करतोय. तर दुसरीकडे बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने येणाऱ्या काळात कुठे खेळवता येतील याची तयारी सुरु केली आहे. भारताचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर बीसीसीआय आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवण्याचा विचार करत आहे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत आयपीएलचा उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासाठी BCCI समोर दोन पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे युएई तर दुसरा पर्याय हा इंग्लंडचा आहे. BCCI चे CEO हेमांग अमिन यांनी आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी दोन पर्याय तयार केले असून २९ तारखेला होणाऱ्या BCCI च्या AGM मध्ये यावर चर्चा होणार आहे. हेमांग अमिन यांच्या मते आयपीएलचा उर्वरित हंगाम हा युएईत खेळवला जावा, कारण याआधी आयपीएल २०२०२ चं आयोजन बीसीसीआयने युएईत केलं होतं.
युएईत आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवला गेल्यास काय आहेत फायदे?
हे वाचलं का?
१) सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत इंग्लंडच्या तुलनेत युएईमधलं तापमान हे अधिक फायदेशीर असेल. या काळात इंग्लंडमध्ये पाऊस पडून सामने वाया जाण्याची शक्यता असते.
२) स्पर्धेच्या आयोजनच्या दृष्टीने युएई हा इंग्लंडपेक्षा तुलनेने स्वस्त पर्याय आहे.
ADVERTISEMENT
३) आयपीएल २०२० मध्ये बीसीसीआयने स्पर्धा युएईत खेळवली होती, त्यामुळे प्रत्येक संघासाठी बायो सिक्युअर बबल तयार करणं सोपं जाईल.
ADVERTISEMENT
इंग्लंडमध्ये आयपीएल खेळवण्याचे फायदे काय आहेत?
१) IPL हा ब्रँड मोठा आणि वाढवण्याच्या दृष्टीकोनातून इंग्लंड हा पर्याय बीसीसीआयसाठी चांगला आहे.
२) इंग्लंडमध्ये फॅन्सला स्टेडीयममध्ये प्रवेश देऊन तिकीटांच्या पैशातून कमाई करण्याची संघमालकांना आणि बीसीसीआयला संधी आहे.
IPL 2021 साठी BCCI ची तयारी सुरु, टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदल करण्याची ECB ला विनंती
या पर्यायांवर बीसीसीआय आगामी AGM मध्ये चर्चा करणार असल्याचं कळतंय. यंदाच्या वर्षात भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं असल्यामुळे त्याआधी बीसीसीआय उर्वरित हंगाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय आता यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT