इंग्लंडविरुद्ध मॅचसाठी BCCI मोदी, शहांना आमंत्रण देणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवीन वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या ग्राऊंडवर पहिल्या दोन टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत. यानंतर उर्वरित दोन टेस्ट मॅच या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडीयमवर खेळवल्या जातील. २४ फेब्रुवारीला मोटेरा ग्राऊंडवर डे-नाइट मॅचला सुरुवात होईल. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयने मोटेरा मैदानावर फॅन्सना मॅच पाहण्याची संधी द्यायचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

लॉकडाउनपश्चात भारतात क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर फॅन्सना मॅच पाहण्यासाठी मैदानावर संधी देण्याची ही पहिलीच वेळ ठरु शकते. चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या दोन्ही टेस्ट मात्र प्रेक्षकांविनाच खेळवल्या जाणार आहेत.

नव्याने बांधण्यात आलेलं मोटेरा मैदान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सर्वात मोठं मैदान आहे. १ लाख १० हजार एवढी या मैदानाची प्रेक्षकसंख्या असणार आहे. या मॅचसाठी बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू, गृहमंत्री अमित शहा यांनाही निमंत्रण दिल्याचं कळतंय. दोन टेस्ट मॅच व्यतिरीक्त या मैदानावर ५ टी-२० सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT