Lord’s Test: भारतीय संघासोबत मैदानात खेळण्यासाठी आलेल्या ‘त्या’ ब्रिटीश नागरिकाचं ट्विट व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने इंग्लंडवर १५१ रन्सने मात करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात अखेरच्या दिवशी भारतीय संघाने केलेला जिगरबाज खेळ खरंच वाखणण्याजोगा होता. परंतू क्रिकेटसोबतच लॉर्ड्स कसोटी सामना अनेक गोष्टींसाठी चर्चेत राहिला.

ADVERTISEMENT

भारतीय खेळाडू आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये भर मैदानात उडालेले खटके हा देखील यातलाच एक प्रकार. १४ ऑगस्टला म्हणजेच शनिवारी सामना सुरु असताना एक ब्रिटिश नागरिक मैदानात शिरला. त्याने भारतीय कसोटी संघाची जर्सी घालत टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत थेट आत मैदानापर्यंत प्रवेश मिळवला. महत्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंसोबत हा व्यक्ती थेट पीचपर्यंत पोहचल्यानंतर स्थानिक सुरक्षारक्षकांना ही बाब लक्षात आली आणि यानंतर त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

हा व्यक्ती भारतीय संघाचा चाहता आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघासोबत क्षेत्ररक्षण करण्याचा हट्ट धरला होता. ज्यानंतर खूप समजावून सुरक्षा रक्षकांनी त्याला मैदानाच्या बाहेर नेऊन सोडले. यादरम्यान या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर खेळाडूंना देखील हे पाहून हसू आवरले नाही.

हे वाचलं का?

Lord’s Test : क्रिकेटच्या पंढरीत भारताचा विजयी जयघोष, इंग्लंडचा १५१ रन्सनी उडवला धुव्वा

आता त्याच ब्रिटिश नागरिकाने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, “मी जारवो, मी तोच व्यक्ती आहे, जो मैदानात गेलो होतो. मला गर्व आहे की भारतीय संघाकडून खेळणारा मी पहिला ब्रिटीश व्यक्ती आहे.” आता हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

अखेरच्या दिवशी सुरुवातीला भारतीय संघाने रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या रूपात लवकर विकेट्स गमावल्यानंतर शेवटच्या फळीतील मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. ज्यात शमीने अर्धशतकी खेळी करत ५६ धावा केल्या. तर बुमराहने ३४ धावा करत ८९ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करतान इंग्लंडचा संघ १२० धावांवर सर्वबाद झाला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT