IPL 2021 : RCB चा जीव भांड्यात, देवदत पडीकलची कोरोनावर मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये सुरुवातीलाच मुंबई इंडियन्ससोबत गाठ पडलेल्या RCB च्या कँपमध्ये थोडं उत्साहाचं वातावरण आहे. कारण RCB चा स्टार ओपनर देवदत पडीकलने कोरोनावर मात केली असून तो संघाच्या ट्रेनिंग कँपमध्ये दाखल झाला आहे. RCB ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली असून देवदतची तब्येत आता चांगली असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

२२ मार्च रोजी देवदतच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला होता, ज्यानंतर तो हॉटेलमधील रुमवर क्वारंटाइन झाला होता. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर देवदत पडीकलच्या दोन कोविड चाचण्या घेण्यात आला, या चाचण्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्याला संघाच्या ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे.

खडतर काळात आपल्या दिलेल्या पाठींब्याबद्दल देवदतने सर्वांचे आभार मानले आहेत. २० वर्षीय पडीकलने आयपीएल २०२० मध्ये आपली चमक दाखवत सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं. १५ सामन्यांत पडीकलने ४७३ रन्स केल्या होत्या. गेल्या हंगामात पडीकलने १२४.८० चा स्ट्राईक रेट आणि ३१.५३ च्या सरासरीने ५ हाफ सेंच्युरीही झळकावल्या होत्या.

हे वाचलं का?

९ एप्रिलला चेन्नईत RCB समोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. यादरम्यान देवदतने आपला फिटनेस सिद्ध केला तर त्याला विराट कोहलीसोबत ओपनिंगला येण्याची संधी मिळणार आहे. विराट कोहली यंदाच्या सिझनमध्ये ओपनिंगला येणार आहे. दरम्यान त्याआधी RCB च्या डॅनिअल सम्सलाही कोरोनाची लागण झाली असून तो क्वारंटाइन होऊन उपचार घेतो आहे.

BCCI टीम इंडियाच्या प्लेअर्सना लस देण्याच्या विचारात – राजीव शुक्ला

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT