IPL 2022 Retaintion : धोनी, कोहली, रोहित, बुमराह आपल्या जुन्या संघाकडूनच खेळणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक संघाला आगामी हंगामासाठी ३ भारतीय आणि १ परदेशी किंवा २ भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू आपल्या संघात कायम राखता येणार आहेत.

ADVERTISEMENT

ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, बंगळुरु, दिल्ली आणि राजस्थान या सात संघांनी आपले कायम राखलेले खेळाडू जाहीर केले आहेत. बहुतांश सर्वच संघांनी आपल्या संघात अनुभवी खेळाडूंना जागा मिळेल याची काळजी घेतली आहे.

चेन्नई सुपरकिंग्जने कायम राखलेले खेळाडू – रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली

हे वाचलं का?

कोलकाता नाईट रायडर्सने कायम राखलेले खेळाडू – सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

सनराईजर्स हैदराबादने कायम राखलेले खेळाडू – केन विल्यमसन

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सने कायम राखलेले खेळाडू – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ADVERTISEMENT

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कायम राखलेले खेळाडू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल

दिल्ली कॅपिटल्सने कायम राखलेले खेळाडू – ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅन्रिच नॉर्ट्जे

राजस्थान रॉयल्सने कायम राखलेले खेळाडू – संजू सॅमसन

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यासाठी प्रत्येक संघाला बीसीसीआयने Purse Amount ९० कोटींपर्यंत वाढवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संघाच्या लिलावात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत, त्यामुळे आगामी हंगामापासून आयपीएल हे दहा संघांनिशी खेळवलं जाणार आहे.

खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी बीसीसीआयने सर्व संघमालकांना टप्पे ठरवून दिले आहेत. जो संघ ४ खेळाडूंना कायम राखेल त्या संघाचे ९० कोटीच्या Purse Amount मधून ४२ कोटी, जो संघ तीन खेळाडूंना कायम राखेल त्याच्या Purse Amount मधून ३३ कोटी, जो संघ दोन खेळाडूंना कायम राखेल त्याच्या Purse Amount मधून २४ कोटी तर जो संघ एकाच खेळाडूला कायम राखेल त्याच्या Purse Amount मधून १४ कोटी कापले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT