IPL 2022: फॉर्मात नसलेल्या अजिंक्यवर KKR ने दाखवला विश्वास, संघाचं नेतृत्व मिळण्याचे संकेत?
भारतीय कसोटी संघाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मामुळे चर्चेत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अजिंक्यने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नसल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलं आहे. अशा परिस्थितीत आगामी आयपीएल हंगामामध्ये अजिंक्य रहाणेवर कोणता संघ बोली लावणार का याबद्दल सर्वांमध्ये उत्सुकता होती. कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटींच्या बेस प्राईजवर अजिंक्यला आपल्या […]
ADVERTISEMENT
भारतीय कसोटी संघाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मामुळे चर्चेत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अजिंक्यने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नसल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलं आहे. अशा परिस्थितीत आगामी आयपीएल हंगामामध्ये अजिंक्य रहाणेवर कोणता संघ बोली लावणार का याबद्दल सर्वांमध्ये उत्सुकता होती.
ADVERTISEMENT
कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटींच्या बेस प्राईजवर अजिंक्यला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.
Welcome aboard, @ajinkyarahane88! ?#KKR #AmiKKR #GalaxyOfKnights #IPLAuction #TATAIPLAuction #AjinkyaRahane pic.twitter.com/Fhx00o4tMx
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 13, 2022
अजिंक्यला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतल्यानंतर ट्विटरवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया पहायला मिळत आहेत. परंतू KKR चं संघ प्रशासन अजिंक्यवर लावण्यात आलेल्या बोलीवर समाधानी आहे. इतकच नव्हे तर आगामी हंगामासाठी KKR चं कर्णधारपदही अजिंक्यकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची सह-मालक जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताने याबद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे.
हे वाचलं का?
Watch Jahnavi Mehta speak about our crucial picks & the #IPLAuction strategy! ?
? @StarSportsIndia #KKR #AmiKKR #GalaxyOfKnights #TATAIPLAuction pic.twitter.com/1aqKplBl6L
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 13, 2022
“नक्कीच, रहाणे हा आमच्यासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू ठरणार आहे. तो गेली अनेक वर्ष खेळतो आहे आणि त्याच्याकडे नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे. आम्ही शुभमन गिलला कायम राखू शकलो नाही त्यामुळे अजिंक्य ती भूमिका निभावू शकतो. अजिंक्यमुळे व्यंकटेश अय्यर अधिक मोकळेपणाने खेळू शकतो”, अशी प्रतिक्रीया जान्हवी मेहताने दिली आहे.
IPL 2022: CSK-KKR आणि दिल्लीची मदार महाराष्ट्रातील खेळाडूंवर, मुंबईची स्थानिक खेळाडूंकडे पाठ
ADVERTISEMENT
आयपीएलच्या मागच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरी गाठली होती. परंतू कर्णधार ओएन मॉर्गनला यंदा KKR ने कायम राखलं नाही. अजिंक्य रहाणेसोबत कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईकर श्रेयस अय्यरसाठीही १२ कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. सध्याच्या घडीला कोलकाता संघात कर्णधारपदासाठी फार कमी उमेदवार आहेत. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद दिल्यास त्याच्या फलंदाजीवर होणारा परिणाम लक्षात घेता KKR चं संघ व्यवस्थापन अजिंक्यकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार करु शकतं असं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियात मी घेतलेल्या निर्णयाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं – अजिंक्य रहाणेने बोलून दाखवली खदखद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT