मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो…जेव्हा सुनील गावसकर पाकिस्तानात जाऊन अपमानाचा बदला घेतात
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या कोरोनामुळे आजारी होत्या. आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या कारकिर्दीत संगीत हे लताबाईंचं एकमेव दैवत होतं. याव्यतिरीक्त लताबाई या क्रिकेटच्याही अस्सल चाहत्या होत्या. सुनील गावसकरांपासून ते सचिन तेंडूलकर आणि नवीन पिढीतला महेंद्रसिंह धोनी हे लताबाईंचे आवडते क्रिकेटपटू होते. भारतीय क्रिकेट संघाने कोणत्याही […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या कोरोनामुळे आजारी होत्या. आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या कारकिर्दीत संगीत हे लताबाईंचं एकमेव दैवत होतं. याव्यतिरीक्त लताबाई या क्रिकेटच्याही अस्सल चाहत्या होत्या. सुनील गावसकरांपासून ते सचिन तेंडूलकर आणि नवीन पिढीतला महेंद्रसिंह धोनी हे लताबाईंचे आवडते क्रिकेटपटू होते.
ADVERTISEMENT
भारतीय क्रिकेट संघाने कोणत्याही स्पर्धेत चांगली कामगिरी केली की लताबाई आपल्या ट्विटर हँडलवर संघाचं आवर्जून कौतुक करायच्या. १९८२ साली भारतीय संघ पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यासाठी गेला असता, सुनील गावसकर यांनी लता मंगेशकरांचं नाव घेऊन आपल्या अपमानाचा बदला घेतला होता.
अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा
हे वाचलं का?
एक दिवस संध्याकाळी लाहोरमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात सुनील गावसकरही सहभागी होते. या पार्टीमध्ये अचानक एका महिलेने एंट्री घेतली. महिलेचा पार्टीतला रुबाब आणि तिची देहबोली पाहता सुनील गावसकरांना ही महिला कोणतीही सेलिब्रेटी असल्याचं लक्षात आलं होतं. त्यावेळी बडोदा महाराज फतेसिंह गायकावड हे संघाचे व्यवस्थापक होते. गायकवाड यांनी सुनील गावसकर यांची महिलेशी ओळख करुन देताना, हे भारताचे कर्णधार आणि सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू सुनील गावसकर आहेत असं सांगितलं.
सुनील गावसकरांकडे पाहिल्यानंतर पार्टीत आलेली ती महिला म्हणोाली, मी यांना ओळखत नाही. मी इम्रान खान-जहीर अब्बास यांना ओळखते. ती महिला होती मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँ. यानंतर ज्यावेळी गायकवाड यांनी नूरजहाँ यांची गावसकरांना ओळख करुन दिली आणि गावसकरांना विचारलं की तुम्ही यांना ओळखलंच असेल? त्याला उत्तर देताना गावसकरांनी मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो असं म्हणत आपल्या अपमानाचा बदला घेतला होता.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.
ADVERTISEMENT
‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT