मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला महत्वाचा ICC पुरस्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीचा मानाचा Rachael Heyhoe Flint Award for the ICC Women’s Cricketer of the Year for 2021 पुरस्कार मराठमोळ्या स्मृती मंधानाने पटकावला आहे.

ADVERTISEMENT

२०२१ मध्ये भारतीय महिला संघाची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही भारतीय संघाने मिळवलेल्या विजयात स्मृतीने मोलाची भूमिका बजावली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघाने मिळवलेल्या दोन विजयांमध्ये स्मृतीने नाबाद ८० आणि ४८ धावांची खेळी केली होती.

याव्यतिरीक्त इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात स्मृतीने पहिल्या डावात ७८ धावांची इनिंग खेळली होती. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तसेच वन-डे आणि टी-२० मालिकेतही स्मृतीने आपल्या फलंदाजीची चमक दाखवत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत स्मृती चांगल्या फॉर्मात होती. दुसऱ्या वन-डे सामन्यात ८६ धावा तर एकमेव कसोटी सामन्यात स्मृतीने शतक झळकावलं होतं.

हे वाचलं का?

याचसोबत भारतीय महिला संघाच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यातही स्मृतीने शतक झळकावलं होतं. या कामगिरीसाठीच तिची मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT