Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Cummins return to Australia : भारताविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान (Border-Gavaskar Series ) ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी आहे. कर्णधार पॅट कमिन्सला (pat cummins return to Australia ) दिल्ली कसोटीनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला परतावे लागले आहे. कमिन्सच्या कुटुंबातील कोणीतरी आजारी आहे, म्हणून त्याला ताबडतोब घरी जावे लागले. मात्र, तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार भारतात परत येऊ शकतो, असे मानले जात आहे. Bad news for Australia after losing Delhi Test

ADVERTISEMENT

Ind vs Aus test: कांगारू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात, ऑस्ट्रेलियाची दाणादाण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीमध्ये दीर्घ विश्रांती आहे. त्यामुळेच पॅट कमिन्सच्या पुनरागमनाची आशाही अबाधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर पॅट कमिन्स इंदूर कसोटीपर्यंत परतला नाही तर तिसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करू शकतो.

हे वाचलं का?

कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. नागपूर कसोटीत संघाला एक डाव आणि 132 धावांनी पराभव पत्करावा लागला होता, तसेच दिल्ली कसोटीत 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. भारताने दोन्ही कसोटी सामने 3-3 दिवसांत जिंकले. यामुळेच ऑस्ट्रेलियन मीडिया, माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ आपापल्या संघावर खडे फोडत आहेत.

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ. , स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क , मिचेल स्वीपसन , डेव्हिड वॉर्नर

ADVERTISEMENT

भारतीय संघ : रोहित शर्मा (क), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव , जयदेव उनाडकट

ADVERTISEMENT

दिल्लीत भारताचा डंका; तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रलियाचा केला 6 गडी राखून पराभव

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

पहिली कसोटी – भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला

दुसरी कसोटी – भारत 6 गडी राखून जिंकला

तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, इंदूर

चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT