Ind vs Eng : Lord’s Test रंगतदार अवस्थेत, भारताकडे १५४ धावांची आघाडी, दुसऱ्या डावात निम्मा संघ माघारी
भारत आणि इंग्लंड यांच्यातला लॉर्ड्स कसोटी सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहचला आहे. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने दुसऱ्या डावात ६ विकेट गमावत १८१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारताकडे १५४ धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत हा एकमेव आश्वासक फलंदाज सध्या मैदानावर असल्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी आणखी प्रयत्नांची […]
ADVERTISEMENT
भारत आणि इंग्लंड यांच्यातला लॉर्ड्स कसोटी सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहचला आहे. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने दुसऱ्या डावात ६ विकेट गमावत १८१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारताकडे १५४ धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत हा एकमेव आश्वासक फलंदाज सध्या मैदानावर असल्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी आणखी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT
इंग्लंडचा दुसरा डाव ३९१ रन्सवर संपुष्टात आल्यानंतर भारताची दुसऱ्या डावातली सुरुवात अडखळती झाली. पहिल्या डावात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसऱ्या डावात अवघ्या ५ रन काढून माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही ठराविक अंतराने मार्क वुडच्या जाळ्यात अडकला. २ बाद २७ अशा खडतर परिस्थितीतून कोहली आणि पुजाराने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू सॅम करनने विराट कोहलीला आऊट करत भारताला आणखी एक धक्का दिला.
Ind vs Eng 2nd Test : भर मैदानात भिडले कोहली-अँडरसन, वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हे वाचलं का?
यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीवर भारताची मदार होती. या दोन्ही फलंदाजांची गेल्या काही सामन्यांतही कामगिरी आश्वासक झालेली नाहीये. परंतू मोक्याच्या क्षणी आपला अनुभव पणाला लावत दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या माऱ्याचा नेटाने सामना केला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात तळ ठोकत भारताची पडझड रोखली. मैदानात जम बसल्यानंतर दोघांनीही धावा जमवण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं. मार्क वुडच्या बाऊन्सर बॉलचा अंदाज न आल्यामुळे चेतेश्वर पुजारा ४५ धावांवर आऊट झाला आणि भारताची जमलेली जोडी फुटली. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १०० धावांची भागीदारी केली.
पुजारा माघारी परतल्यानंतर फिरकीपटू मोईन अलीने भारताला दोन महत्वाचे धक्के दिले. अजिंक्य रहाणे आणि त्यापाठोपाठ रविंद्र जाडेजाला माघारी धाडत इंग्लंडने सामन्यात दमदार कमबॅक केलं. अखेरच्या सत्रात नवीन बॉल घेण्याची संधी असतानाही जो रुटने दोन्ही बाजूंनी स्पिनर बॉलिंग अटॅक ठेवत भारतावर प्रेशर आणलं. अखेरीस अपुऱ्या प्रकाशामुळे पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला. त्यामुळे लॉर्ड्स कसोटी सामना वाचवण्यासाठी अखेरच्या दिवशी पंतसह इतर भारतीय फलंदाजांना आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
ADVERTISEMENT
Ind vs Eng : Lords कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंकडून Ball Tampering चा प्रयत्न? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT