Ind vs Eng : रोहित-लोकेश राहुलने गाजवला दिवस, Lord’s वर पहिल्या दिवशी भारताचं वर्चस्व

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने आपलं वर्चस्व सामन्यावर निर्माण केलं आहे. लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि रोहित शर्माचं दमदार अर्धशतक या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस ३ विकेट गमावत २७६ रन्सपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा लोकेश राहुल नाबाद १२७ तर अजिंक्य रहाणे १ रनवर खेळत होता.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय संघाने संघात एक बदल करुन शार्दुल ठाकूरच्या जागी इशांत शर्माला संधी दिली. परंतू पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगलट आला.

सामन्यात सुरुवातीच्या दोन सत्रांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काहीकाळासाठी खेळ थांबवावा लागला. परंतू रोहित शर्मा आणि लोकेश राहुल जोडीने मैदानावर जम बसवून इंग्लंडला बॅकफूटला ढकललं. रोहित आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १२६ रन्सची पार्टनरशीप केली. रोहित शर्माने काही सुरेख ठेवणीतले फटके खेळत आपली चमक दाखवून दिली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रोहित आपलं पहिलं कसोटी शतक करणार असं वाटत असतानाच जेम्स अँडरसनने एका सुरेख इनस्विंगवर रोहितला आऊट केलं. त्याने १८५ बॉलमध्ये ११ फोर आणि १ सिक्स लगावत ८३ रन्स केल्या. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजाराही फारसा तग धरु शकला नाही. अँडरसनने त्याला बेअरस्टोकरवी आऊट केलं.

हे वाचलं का?

लोकेश राहुल मात्र एक बाजू लावून उभा होता. विराट कोहलीच्या साथीने त्याने पुन्हा एकदा भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. विराट कोहलीसोबत लोकेश राहुलने ११७ रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडच्या नाकीनऊ आणले. पहिल्या कसोटीत शतकाची संधी हुकल्यानंतर राहुलने लॉर्ड्सवर संधी न गमावता शतक झळकावत आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं. दिवस संपायला अखेरची ५ षटकं बाकी असताना कर्णधार विराट कोहली रॉबिन्सनच्या बॉलिंगवर आऊट झाला, त्याने ४२ रन्स केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने दिवस खेळून काढला.

Ind vs Eng : Lord’s च्या मैदानावर चमकला लोकेश राहुल, विक्रमी शतकासह इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT