Ind vs Eng : टीम इंडियाचं दमदार कमबॅक, दिवसाअखेरीस इंग्लंडच्या ३ विकेट
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दिवसाअखेरीस दमदार कमबॅक केलं आहे. सर्वात आधी शार्दुल ठाकूरच्या फटकेबाजीमुळे भारताने १९१ धावसंख्येपर्यंत मजल मारली. यानंतर अखेरच्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ५३ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताच्या तुलनेत इंग्लंडची सुरुवात […]
ADVERTISEMENT
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दिवसाअखेरीस दमदार कमबॅक केलं आहे. सर्वात आधी शार्दुल ठाकूरच्या फटकेबाजीमुळे भारताने १९१ धावसंख्येपर्यंत मजल मारली. यानंतर अखेरच्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ५३ धावांपर्यंत मजल मारली होती.
ADVERTISEMENT
भारताच्या तुलनेत इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने सलामीवीर रोरी बर्न्सला ५ धावांवर क्लिन बोल्ड केलं. यापाठोपाठ हासिब हमीदही बुमराहचा बाऊन्सर खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतकडे कॅच देऊन माघारी परतला. सलामीवीर माघारी परतल्यानंतर कॅप्टन जो रुट आणि ड्वाईड मलान या दोघांनीही इंग्लंडचा डाव सावरला. ही जोडी पहिला दिवस खेळून काढणार असं वाटत असतानाच उमेश यादवच्या टप्पा पडून आत येणाऱ्या बॉलचा अंदाज घेण्यात जो रुट फसला आणि भारताला तिसरं यश मिळालं.
आतापर्यंत मालिकेत ३ शतकी खेळी करणाऱ्या जो रुटला स्वस्तात माघारी धाडण्यात भारतीय बॉलर्स यशस्वी ठरले. उमेश यादवने २१ रन्सवर रुटला क्लिन बोल्ड केलं. यानंतर मलान आणि ओव्हरटन यांनी उरलेली षटकं खेळून काढत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.
हे वाचलं का?
Ind vs Eng : गुडघ्यातून भळाभळा रक्त येत असतानाही Anderson बॉलिंग करत राहिला, सोशल मीडियावर कौतुक
त्याआधी, टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताचे आघाडीच्या फळीतले सर्व फलंदाज अपयशी ठरले. परंतू मोहम्मद शमीच्या जागेवर संघात स्थान मिळालेल्या शार्दुल ठाकूरने उमेश यादवच्या साथीने सामन्याचं चित्रच बदललं. इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेत शार्दुलने मैदानात चौकार-षटकार लगावण्यास सुरुवात केली.
ADVERTISEMENT
शार्दुलच्या या आक्रमक खेळीमुळे इंग्लंडचा संघही काहीकाळ बॅकफूटला ढकलला गेला. शार्दुलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू यानंतर फटकेबाजीच्या नादात तो आऊट झाला, त्याने ५७ रन्स केल्या. यानंतर भारताचे उर्वरित तळातले फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत आणि भारताचा डाव १९१ रन्सवर संपला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ४, ओली रॉबिन्सनने ३ तर अँडरसन आणि ओव्हरटन यांनी १-१ विकेट घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT