Ind vs NZ : एजाज पटेलचा मुंबईत विक्रम, एकाच डावात १० बळी घेत दिग्गज बॉलर्सच्या पंगतीत स्थान
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबईच्या वानखेडे मैदानावरील सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळात नवा विक्रम झाला आहे. मुळचा मुंबईकर असलेल्या ऐजाज पटेलने न्यूझीलंडकडून खेळताना पहिल्या डावात १० बळी घेतले आहेत. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर एकाच डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा तिसरा बॉलर ठरला आहे. एजाजने भारताचा पहिला डाव हा ३२५ धावांवर संपवला आहे. […]
ADVERTISEMENT
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबईच्या वानखेडे मैदानावरील सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळात नवा विक्रम झाला आहे. मुळचा मुंबईकर असलेल्या ऐजाज पटेलने न्यूझीलंडकडून खेळताना पहिल्या डावात १० बळी घेतले आहेत. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर एकाच डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा तिसरा बॉलर ठरला आहे. एजाजने भारताचा पहिला डाव हा ३२५ धावांवर संपवला आहे.
ADVERTISEMENT
? Jim Laker
? Anil Kumble
? Ajaz PatelRemember the names! #WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8yST5 pic.twitter.com/xDVImIifM6
— ICC (@ICC) December 4, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावात १० बळी घेण्याचा विक्रम आतापर्यंत जिम लेकर आणि अनिल कुंबळे या दोनच गोलंदाजांनी केला होता. या मानाच्या पंगतीत आता एजाजला स्थान मिळालं आहे. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर भारताच्या अनिल कुंबळेने १९९९ साली फिरोजशहा कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात ही करामत केली होती. एजाज पटेल हा मुळचा मुंबईकर, पटेलच्या परिवाराने तो ८ वर्षांचा असताना न्यूझीलंडची वाट धरली. त्यामुळे एका अर्थाने आपल्या होमग्राऊंडवर खेळताना एजाजने हा अनोखा विक्रम करत आपली कसोटी कारकीर्द संस्मरणीय केली आहे.
Only the third bowler to claim all 10 wickets in an innings in the history of Test cricket ?
Take a bow, Ajaz Patel! #WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/negtQkbeKd
— ICC (@ICC) December 4, 2021
एजाज पटेलने ४७.५ ओव्हर्टस टाकून १०९ रन्स देत टीम इंडियाचा पहिला डाव एकट्याच्या जिवावर संपवला. यामध्ये एजाजने १२ ओव्हर्स मेडनही टाकल्या. वानखेडेच्या खेळपट्टीचा सुरेख वापर करत एजाजने टीम इंडियाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. भारताकडून मयांक अग्रवालच्या १५० धावा आणि त्याला मधल्या फळीत अक्षर पटेलने अर्धशतक झळकावत उत्तम साथ दिली. याच जोरावर भारतीय संघ पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारु शकला. एजाज पटेलने पहिल्या डावात एकाच ओव्हरमध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला आपल्या जाळ्यात अडकवत टीम इंडियाला मोठा धक्का दिला होता.
हे वाचलं का?
खराब फॉर्मचा फटका ! Rahane चं उप-कर्णधारपद जाण्याचे संकेत, Rohit Sharma कडे सूत्र जाण्याची शक्यता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT