Ind vs SL : कोरोनाचा फटका बसलेल्या टीम इंडियाला श्रीलंकेचा धक्का, दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत बरोबरी
दुसऱ्या टी-२० सामन्याआधी ऑल राऊंडर कृणाल पांड्याला झालेली कोरोनाची लागण, महत्वाच्या ८ खेळाडूंना संघाबाहेर जावं लागलं. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंनिशी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतावर ४ विकेट राखून मात केली. या विजयासह श्रीलंकेने टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या ८ ही […]
ADVERTISEMENT
दुसऱ्या टी-२० सामन्याआधी ऑल राऊंडर कृणाल पांड्याला झालेली कोरोनाची लागण, महत्वाच्या ८ खेळाडूंना संघाबाहेर जावं लागलं. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंनिशी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतावर ४ विकेट राखून मात केली. या विजयासह श्रीलंकेने टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
ADVERTISEMENT
कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या ८ ही खेळाडूंना भारताने या सामन्यात विश्रांती दिली. त्यांच्या जागेवर ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा, चेतन साकरीया यांना संघात स्थान देण्यात आलं. टॉस जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा फिल्डींगचा निर्णय घेतला.
ऋतुराज गायकवाड आणि शिखर धवन जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये ४९ रन्सची पार्टनरशीप झाल्यानंतर दसून शनकाने गायकवाडला माघारी धाडलं. यानंतर आयपीएल गाजवणाऱ्या देवदत्त पडीक्कलने कॅप्टन शिखर धवनला चांगली साथ दिली. अकीला धनंजयने शिखरला क्लिन बोल्ड करत भारताची जोडी फोडली. धवन ४० रन्सवर आऊट झाला. यानंतर तुलनेने नवोदीत खेळाडूंचा भरणार असलेला भारतीय संघ मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करु शकला नाही. ज्यामुळे निर्धारित ओव्हर्समध्ये भारताने १३२ रन्सपर्यंत मजल मारली.
हे वाचलं का?
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेची सुरुवात काहीशी अडखळत झाली. भुवनेश्वर कुमारने अविष्का फर्नांडोला माघारी धाडत लंकेला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने समरविक्रमा आणि दसून शनकाही आऊट झाले. दरम्यानच्या काळात मिनोद भनूकाने काही सुंदर फटके खेळत लंकेसाठी धावा जोडल्या. भनूका आऊट झाल्यानंतर धनंजय डी-सिल्वाने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. चमिका करुणरत्नेच्या साथीने अखेरच्या ओव्हरपर्यंत मैदानावर टिकून राहत श्रीलंकेने सामन्यात बाजी मारली. याच मैदानावर गरुवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT