IND Vs SL 3rd T20: टॉसच्या वेळी रोहित शर्माकडून झाली चूक, म्हणाला… ‘मला खूप सांभाळून बोलावे लागेल’
धरमशाला: भारत आणि श्रीलंका यांच्यात धरमशाला येथे तिसरा टी-20 सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करत आहे. दरम्यान, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात नाणेफेकीसाठी आला तेव्हा तो असं काहीतरी बोलला की ज्यानंतर त्याला असं म्हणावं लागलं की, ‘मला खूप सावधपणे बोलावे लागेल.’ जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं असं काय घडलं. खरंतर, […]
ADVERTISEMENT
धरमशाला: भारत आणि श्रीलंका यांच्यात धरमशाला येथे तिसरा टी-20 सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करत आहे. दरम्यान, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात नाणेफेकीसाठी आला तेव्हा तो असं काहीतरी बोलला की ज्यानंतर त्याला असं म्हणावं लागलं की, ‘मला खूप सावधपणे बोलावे लागेल.’ जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं असं काय घडलं.
ADVERTISEMENT
खरंतर, जेव्हा रोहित शर्मा टॉसच्या वेळी बोलू लागला तेव्हा समालोचक मुरली कार्तिकने त्याला विचारले की, संघात किती बदल झाले आहेत? ज्यावर रोहित शर्माने सांगितले की, इशान किशन दुखापतीमुळे या सामन्याला मुकत आहे, त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल हे देखील या सामन्याला मुकणार आहेत.
पण यावेळी कर्णधार रोहित शर्माने ताबडतोब स्वतःला सावरत आपली चूक दुरुस्त केली आणि सांगितलं की, ‘नाही.. नाही.. या सर्वांना विश्रांती देण्यात आली आहे. मला असं म्हणायचं होतं. मला खूप काळजीपूर्वक आणि सांभाळून बोलावं लागेल.’ दरम्यान, रोहितच्या या वाक्यानंतर मुरली कार्तिक आणि रोहित शर्मा हे दोघेही खळखळून हसलेही.
हे वाचलं का?
रोहित शर्माची फनी स्टाइल सगळ्यांनाच माहीत आहे, कधी कधी तो पत्रकार परिषदेला येतो तेव्हा देखील त्याची मजेशीर उत्तरे ही वातावरणातील ताण काहीसा कमी करतात. रोहित शर्माचे आजचं उत्तर देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने चार बदल केले आहेत. इशान किशनशिवाय भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. या चौघांऐवजी आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडिया प्लेईंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ADVERTISEMENT
टीम इंडिया पुन्हा एक धक्का! ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
भारत-श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या आधीच भारताला मोठा झटका बसला होता. जायबंदी झाल्याने सलामीवीर ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी आता मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं आहे. ऋतुराज आधी गोलंदाज दीपक चहरने जायबंदी झाल्यानं मालिकेतून माघार घेतली.
सध्या श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असून, तीन टी20 तर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिले दोन टी20 सामने झाले असून यात भारतानेच विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या सामन्यापूर्वी ऋतुराज गायकवाड संघातून बाहेर झाला आहे.
Ind vs SL: टीम इंडियाकडून लंकादहन! सॅमसन-जाडेजाकडून श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला खेळवण्यात आलं नव्हतं. बीसीसीआयने याचं कारण सांगताना म्हटलं होतं की, ऋतुराज गायकवाडने त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो, असं बीसीसीआयने म्हटलं होतं. त्यामुळेच ऋतुराज पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम ऋतुराजच्या तपासण्या करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT