सूर्यकुमार Out की Not Out? अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलमुळे नेटकरी भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १७४ रन्सचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करणाऱ्या सूर्यकुमार यादवने ५७ रन्सची इनिंग खेळत टीम इंडियाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावली. परंतू ज्या पद्धतीने थर्ड अंपायरने सूर्यकुमार यादवला आऊट ठरवलं, त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला असून नेटकऱ्यांनी अंपायरवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात

नेमकं घडलं तरी काय??

हे वाचलं का?

हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर सॅम करनच्या बॉलिंगवर सूर्यकुमारने एक मोठा शॉट मारला. यावेळी बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या ड्वाइड मलानने सूर्यकुमारचा कॅच घेतला. परंतू हा कॅच जमिनीला लागून घेतल्यामुळे अंपायर्सनी थर्ड अंपायरचं मत घेतलं. मैदानावरील अंपायर्सनी सॉफ्ट सिग्नल देताना सूर्यकुमार आऊट असल्याचं सांगितलं.

Ind vs Eng : अहमदाबादमध्ये मुंबईचा ‘सूर्य’तळपला, टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंच्युरी

ADVERTISEMENT

थर्ड अंपायरही होते गोंधळात –

ADVERTISEMENT

सूर्यकुमार यादव आऊट आहे की नाही हे तपासत असताना थर्ड अंपायर विरेंद्र शर्मा आणि टेक्निकल क्रू मधलं संभाषण काहीसं असं होतं…

थर्ड अंपायर – मी या अँगलबद्दल कन्फ्युज आहे, मला जरा वेगवेगळे अँगल्स दाखवा.

ज्यानंतर टेक्निकल क्रू विविध अँगल थर्ड अंपायर्सना दाखवतो

थर्ड अंपायर – मी अजुनही गोंधळात आहे

यानंतर टेक्निकल क्रू पुन्हा एकदा थर्ड अंपायर विरेंद्र शर्मा यांना आणखी काही अँगल दाखवतो.

थर्ड अंपायर – हा अँगलही कन्फ्युजिंग आहे…काही क्षणासाठीचा पॉज. मी माझा निर्णय नक्की केला आहे. बिग स्क्रिनवर Out असं दाखवा.

ड्वाइड मलानने सूर्यकुमारचा कॅच हा अगदी जमिनीला लागून घेतला होता. ज्यात बॉलचा काही भाग हा जमिनीला लागत असल्याचं दिसून येत होतं. परंतू या निर्णयावर येण्यासाठी पुरेसा पुरावा आणि अँगल उपलब्ध नसल्यामुळे थर्ड अंपायर विरेंद्र शर्मा यांनी मैदानावरील अंपायरांचा निर्णय योग्य ठरवत सूर्यकुमार यादवला आऊट ठरवलं. परंतू विरेंद्र शर्मा यांचा हाच निर्णय अनेकांना खटकला असून अंपायर्सनी सूर्यकुमारला नॉट आऊट ठरवायला हवं होतं असं म्हटलंय.

Soft Signal बद्दल आयसीसीचा नियम काय सांगतो??

एखाद्या सामन्यात, प्लेअरने जमिनीला लागून कॅच घेतला असेल. अशा परिस्थितीत जर अंपायर्सना प्लेअरने घेतलेला कॅच योग्य पद्धतीने घेतला आहे की नाही हे दिसलं नसेल तर ते थर्ड अंपायरची मदत घेऊ शकतात. त्याआधी मैदानावरील अंपायर्सना थर्ड अंपायरला खेळाडू आऊट की नॉट आऊट असा एक सॉफ्ट सिग्नल द्यावा लागतो.

मैदानावरील अंपायरनी सॉफ्ट सिग्नल दिल्यानंतर थर्ड अंपायरला हा निर्णय चुकीचा ठरवायचा असेल तर तितके ठोस पुरावे किंवा कॅमेरा अँगल उपलब्ध असणं गरजेचं असतं. जर थर्ड अंपायरकडे पुरेसा पुरावा किंवा योग्य कॅमेरा अँगल उपलब्ध नसेल तर मैदानावरील अंपायरचा निर्णय हा कायम ठेवला जातो.

एकीकडे सोशल मीडियावर अनेक जणं थर्ड अंपायरवर टीका करत असताना अनेकांनी आयसीसीने Soft Signal च्या नियमांमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. विरेंद्र शर्मा यांचा निर्णय वादग्रस्त असला तरीही ते आयसीसीचा नियम पाळत होते. त्यामुळे या सामन्यानंतर आयसीसी याबद्दल काही भूमिका घेतं का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

मोक्याच्या क्षणी विराट कोहली फेल, टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी घटना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT