IND VS PAK T20 World Cup 2021: भारताचं पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दुबई: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना 151 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान असणार आहे. या सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पाकिस्तानी गोलंदाजींना देखील योग्य ठरवला. कारण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या काही ओव्हरमध्ये भारताने आपले दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल यांच्यासह सूर्यकुमारची विकेटही गमावली.

ADVERTISEMENT

एकीकडे टीम इंडियाचे शिलेदार झटपट बाद होत असताना दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने मात्र एकाकी झुंज दिली. यावेळी त्याला रिषभ पंतने देखील चांगली साथ दिली. रिषभने 30 चेंडूत 39 रन्स केले तर विराटने झुंजार अर्धशतक झळकावलं. पण यावेळी भारताच्या इतर फलंदाजांनी मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे भारत 20 ओव्हरमध्ये फक्त 151 रन्सपर्यंतच मजल मारली.

LIVE UPDATE:

हे वाचलं का?

  • विराट कोहलीने झळकावलं अर्धशतक, 45 चेंडूत 50 धावा

  • भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार विराटची झुंजार खेळी

  • ADVERTISEMENT

  • भारताने गमावली चौथी विकेट, रिषभ पंत 39 रन्सवर बाद

  • ADVERTISEMENT

  • रिषभ पंतची जोरदार फटकेबाजी, ठोकले सलग दोन षटकार

  • भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव 11 रन्सवर बाद

  • सूर्यकुमारने यादवचा शानदार फटेकबाजी

  • कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव मैदानात

  • टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल 3 रन करुन बाद

  • टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर रोहित शर्मा शून्यावर बाद

  • पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात ही अत्यंत खराब झाली आहे.

  • रोहित-राहुल झटपट बाद

  • टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडत आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा शून्यावर बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या एका शानदार चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तर त्यानंतर अवघ्या 3 रन्सवर सलामीवीर केएल राहुल देखील बाद झाला.

    पाकिस्तानसोबतच्या या सामन्यात टीम इंडियाच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारण नुकताच भारताला तिसरा धक्का बसला आहे. सुरुवातीला चांगली फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव हा 11 रन्स करुन बाद झाला.

    Ind vs Pak : तब्बल ५ वर्षांनी रोहितच्या बाबतीत घडला दुर्दैवी योगायोग, आफ्रिदीचा भेदक मारा

    आयपीएल खेळल्यानंतर भारतीय संघ थेट टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्यामुळे अनेक खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यावेळी टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्लेइंग-11 निवडणं हा आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळणार की नाही? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. कारण मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याने हार्दिक गोलंदाजी करत नाहीए. मात्र, असं असलं तरीही विराटने हार्दिकवर विश्वास व्यक्त केला आहे.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकात एकूण 5 सामने झाले असून टीम इंडियाने पाचही वेळा विजय मिळवला आहे. या सामन्यांमध्ये 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. जो टीम इंडियाने अत्यंत रोमांचक पद्धतीने जिंकला होता.

    या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा विश्वचषक जिंकायचा आहे. सुपर-12 फेरीच्या या सामन्यापूर्वी भारताने दोन सराव सामने खेळले होते, जे दोन्ही जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या उद्देशानेच उतरेल.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT