भारतीय महिलांनी Tokyo Olympics मध्ये रचला इतिहास, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठण्याची भारतीय महिलांची ही पहिलीच वेळ ठरली आहे. गुरजित कौरच्या एकमेव गोलच्या आधारावर भारतीय महिलांनी टोकियोत हा इतिहास घडवला.

ADVERTISEMENT

सामना सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतू प्रत्यक्ष सामन्यात चित्र वेगळंच पहायला मिळालं. भारतीय महिलांनी पहिल्या सत्रापासून सफाईदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला कडवं आव्हान दिलं. पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी एकही गोल केला नाही पण ऑस्ट्रेलियालाही एकही गोल करु दिला नाही. दुसऱ्या सत्रात भारताने अखेरीस गोलपोस्टवरची कोंडी फोडली.

Tokyo Olympic 2020 : ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत, इंग्लंडवर ३-१ ने मात

हे वाचलं का?

२२ व्या मिनीटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत १-० अशी आघाडी घेतली. या धक्क्यातून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू सावरुच शकल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतू गोलकिपर सविता पुनियाने ऑस्ट्रेलियाचं प्रत्येक आक्रमण परतवून लावलं. या सामन्यात भारतीय बचावफळीचाही खेळही उत्तम होता. पेनल्टी कॉर्नरवर एकसुरी फटके खेळण्याचा फटका ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसला. चौथ्या सत्रात शेवटच्या ३ मिनीटापर्यंत ऑस्ट्रेलिया गोल करण्यात अपयशी ठरली. यानंतर खेळाडू मानसिकरित्या खचलेल्या पहायला मिळाल्या. सरतेशेवटी भारतीय महिलांनी १-० असा विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Tokyo Olympic 2020 : Well Done पी. व्ही. सिंधू, पाहा खास फोटो

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT