IPL 2021 : जाडेजाची फटकेबाजी, Purple Cap Holder हर्षल पटेलच्या नावावर नकोसा विक्रम
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने RCB विरुद्ध सामन्यात १९१ पर्यंत मजल मारली. रविंद्र जाडेजाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. जाडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत ३७ रन्स काढल्या. रविंद्र जाडेजाच्या या फटकेबाजीमुळे यंदाच्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेलच्या नावावर नकोशा […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने RCB विरुद्ध सामन्यात १९१ पर्यंत मजल मारली. रविंद्र जाडेजाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. जाडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत ३७ रन्स काढल्या.
ADVERTISEMENT
रविंद्र जाडेजाच्या या फटकेबाजीमुळे यंदाच्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात हर्षल पटेल सर्वात महागडी ओव्हर टाकणारा बॉलर ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये १५ विकेट घेत हर्षस पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. RCB चा संघ बॉलिंग करत असताना एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत हर्षलने चांगली सुरुवातही केली होती. परंतू जाडेजाच्या एका ओव्हरने सामन्याचं चित्रच पालटलं.
हे वाचलं का?
Most expensive overs in IPL:
37 – Parameswaran, KTK vs RCB, 2011
37 – Harshal, RCB vs CSK, 2021
33 – Awana, KXIP vs CSK, 2014
33 – Bopara, KKR vs KXIP, 2010
31 – Rahul Sharma, PWI vs RCB, 2012#IPL2021 #RCBvsCSK— Bharath Seervi (@SeerviBharath) April 25, 2021
Most expensive 20th overs in IPL:
37 – Harshal vs CSK, 2021 (Jadeja)
30 – Jordan vs DC, 2020 (Stoinis)
30 – Ngidi vs RR, 2020 (Archer)
30 – Dinda vs MI, 2017 (H Pandya)#IPL2021 #RCBvsCSK— Bharath Seervi (@SeerviBharath) April 25, 2021
रविंद्र जाडेजाने २८ बॉलमध्ये ४ फोर आणि ५ सिक्स लगावत नाबाद ६२ रन्स केल्या. बॅटिंग व्यतिरीक्त बॉलिंग आणि फिल्डींगमध्येही जाडेजाने आपली चमक दाखवली. ४ ओव्हरमध्ये १३ रन्स देत जाडेजाने २ महत्वपूर्ण विकेट घेतल्या आणि एक सुरेख रनआऊटही केला.
Jadeja is the first CSK player and overall the 13th instance of a player scoring 50+ and taking 3+ wkts in an IPL match. #IPL2021 #RCBvsCSK
— Bharath Seervi (@SeerviBharath) April 25, 2021
Players scoring 50+ and taking 3+ wkts in an IPL match:
Yuvraj Singh (3 times)
Watson (2 times)Y Pathan
Valthaty
Gayle
Pollard
Duminy
Stoinis
H Pandya
Jadeja #IPL2021 #RCBvsCSK— Bharath Seervi (@SeerviBharath) April 25, 2021
याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये एकाच ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावणाऱ्या मोजक्या बॅट्समनच्या यादीतही जाडेजाला स्थान मिळालं आहे.
ADVERTISEMENT
5 6s in an Over in IPL
Chris Gayle
Rahul Tewatia
Ravindra Jadeja*#RCBvsCSK— CricBeat (@Cric_beat) April 25, 2021
हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाने अशी केली फटकेबाजी –
ADVERTISEMENT
-
पहिला बॉल : डिप-मिडवेकिटच्या दिशेने सिक्स
दुसरा बॉल : यॉर्कर टाकण्याचा हर्षलचा प्रयत्न फसला, जाडेजाने आणखी एक सिक्स लगावला
तिसरा बॉल : हर्षल पटेलचा नो-बॉल…जाडेजाने पुन्हा डिप-मिडविकेटच्या दिशेने लगावला सिक्स
तिसरा बॉल* : रविंद्र जाडेजाचा आणखी एक सिक्स
चौथा बॉल : एक्स्ट्रा कव्हरच्या पोजिशनवर जाडेजाची कॅच घेण्याची संधी RCB ने सोडली, दोन रन्स काढत जाडेजा पुन्हा स्ट्राईकवर
पाचवा बॉल : जाडेजाचा आणखी एक उत्तुंग षटकार
सहावा बॉल : अखेरच्या बॉलवर चौकार लगावत जाडेजाने एकाच ओव्हरमध्ये वसूल केल्या ३७ रन्स
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT