IPL 2021 Explainer : गतविजेत्या मुंबईची खराब सुरुवात, संघात हे ३ बदल करणं गरजेचं
मुंबई इंडियन्स…आयपीएलमधली सर्वात यशस्वी टीम. आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या सिझनमधली सुरुवात मात्र काहीशी डळमळीत झाली आहे. चौदाव्या सिझनमध्ये पहिल्याच सामन्यात RCB कडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईने KKR आणि SRH ला पराभवाचा धक्का दिला. परंतू यानंतर दिल्ली आणि पंजाबकडून मुंबई पुन्हा एकदा पराभूत झाली. लागोपाठ झालेल्या दोन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्स…आयपीएलमधली सर्वात यशस्वी टीम. आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या सिझनमधली सुरुवात मात्र काहीशी डळमळीत झाली आहे. चौदाव्या सिझनमध्ये पहिल्याच सामन्यात RCB कडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईने KKR आणि SRH ला पराभवाचा धक्का दिला. परंतू यानंतर दिल्ली आणि पंजाबकडून मुंबई पुन्हा एकदा पराभूत झाली.
ADVERTISEMENT
लागोपाठ झालेल्या दोन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या संघातले काही महत्वाचे कच्चे दुवे प्रामुख्याने समोर येत आहेत. चेन्नईच्या स्लो पिचवर…मुंबई इंडियन्स म्हणावी तशी सुरुवात करु शकली नाही, मिडल ऑर्डरमध्ये पांड्या बंधूंचं अपयश अशा अनेक समस्या मुंबई इंडियन्सला सध्या सतावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईला आपल्या संघात काही महत्वाचे बदल करण्याची गरज आहे. हे बदल कोणते असणार आहेत हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.
१) क्विंटन डी-कॉक ला विश्रांतीची गरज –
हे वाचलं का?
दक्षिण आफ्रिकेच्या या लेफ्ट हँड बॅट्समनचं यंदा काहीतरी बिनसलं आहे. दुसऱ्या मॅचमधल्या ४० रन्सचा अपवाद सोडला तर डी-कॉक यंदाच्या हंगामात आतापर्यंत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाहीये. डी-कॉक फॉर्मात नसल्यामुळे मुंबई इंडियन्स म्हणावी तशी सुरुवात मिळत नाहीये…ज्याचा फटका त्यांना अखेरच्या ओव्हर्समध्ये बसतोय. त्यामुळे क्विंटन डी-कॉकला विश्रांती देऊन मुंबई इंडियन्सने ख्रिस लिनला संधी द्यावी अशी मागणी आता व्हायला लागली आहे.
RCB विरुद्ध पहिल्या सामन्यात ख्रिस लिन मुंबईकडून पहिली मॅच खेळला होता. या मॅचमध्ये त्याने ४९ रन्स केले…पण यानंतर त्याला संघाबाहेर बसावं लागलं. पण सध्या डी-कॉक म्हणावी तशी चांगली कामगिरी करु शकत नसल्यामुळे आता मुंबईने ख्रिस लिनला संधी द्यावी अशी मागणी फॅन्सकडून व्हायला लागली आहे.
ADVERTISEMENT
२) इशान किशनची बॅटही शांतच –
ADVERTISEMENT
आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या मिडर ऑर्डरने म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही, आणि याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विकेटकिपर-बॅट्समन इशान किशनचं फॉर्मात नसणं. आयपीएल २०२० मध्ये किशन चांगल्याच फॉर्मात होता, आपल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर त्याने भारतीय संघात जागाही मिळवली. परंतू या सिझनमध्ये इशान किशनच्या बॅटमधून अजुनही रन्स निघत नाहीयेत. आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये किशन फक्त ७३ रन्स करु शकला आहे.
ज्या मिडल ऑर्डरमध्ये इशान किशन फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो तेच काम त्याला यंदा जमलं नाहीये. आतापर्यंतच्या मॅचमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे २८…यावरुन किशनचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात येतं. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सकडे आदित्य तरे सारखा विकेटकिपर-बॅट्समन तयार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मुंबईचं मॅनेजमेंट या प्लेअरला संधी देऊ शकतं.
३) हार्दिक पांड्या असून अडचण नसून खोळंबा –
ऑलराऊंड परफॉर्मन्स ही हार्दिक पांड्याची जमेची बाजू…मधल्या फळीत आक्रमक फटकेबाजी आणि मिडल ओव्हर्समध्ये बॉलिंग करुन महत्वाच्या विकेट घेण्यासाठी हार्दिक पांड्या ओळखला जातो. परंतू यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे मुंबईचं मॅनेजमेंट हार्दिकला बॉलिंगची संधी देत नाहीये. ज्यामुळे एका अधिकच्या बॉलरसाठी मुंबईला आता हार्दिकवर अवलंबून राहता येत नाहीये. हार्दिक पांड्या बॉलिंग करु शकत नसला तरीही फिल्डींगमध्ये तो आपली भूमिका चोख बजावतो आहे.
परंतू आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये हार्दिकची बॅट अजूनही शांत आहेत. ज्या ओव्हर्समध्ये मुंबईला स्कोअर वाढवण्याची गरज असते. तिकडे हार्दिक पांड्या लवकर आऊट होतोय…ज्यामुळे महत्वाच्या क्षणांमध्ये मुंबईचा संघ बॅकफूटला फेकला जातोय. त्यामुळे हार्दिक सध्या अपेक्षित रिझल्ट देत नसेल तर त्याला काही क्षणांसाठी विश्रांती देऊन मुंबई इंडियन्स सौरभ तिवारीचा विचार करु शकतं.
सध्याची परिस्थिती मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची नसली तरीही विचार करायला लावणारी नक्कीच आहे. चेन्नईतले सामने संपवून मुंबईचा संघ आता पुढचे सामने दिल्लीत खेळणार आहे. दिल्लीत सामने सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सकडे मोठा कालावधी आहे. तोपर्यंत मुंबईचं टीम मॅनेजमेंट आपल्या संघाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT