IPL 2021 : कुलदीप यादव गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर, स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यावर साशंकता
टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आयपीएलमध्ये आपल्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे कुलदीप यादव युएईवरुन भारतात परतला असून तो आगामी स्थानिक क्रिकेटच्या हंगामातही खेळू शकेल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. सध्या कुलदीप यादव आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. परंतू फॉर्मात नसल्यामुळे त्याला अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळत नाहीये. […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आयपीएलमध्ये आपल्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे कुलदीप यादव युएईवरुन भारतात परतला असून तो आगामी स्थानिक क्रिकेटच्या हंगामातही खेळू शकेल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
सध्या कुलदीप यादव आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. परंतू फॉर्मात नसल्यामुळे त्याला अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळत नाहीये. युएईमध्ये सरावादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचं कळतंय. त्याला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकेल असं वाटत नाहीये. म्हणूनच त्याला आम्ही भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.
IPL 2021 : CSK ची गाडी सुस्साट, अटीतटीच्या लढतीत KKR वर मात
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार कुलदीप यादवच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रीया झालेली असून तो पुढील ४ ते ६ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही असं बोललं जातंय. गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी खेळाडूंना बराच कालावधी जातो. दुखापत बरी झाली की NCA मध्ये फिजीओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करुन फिट असल्याचं सर्टिफीकेट मिळवल्यानंतरच कुलदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकेल. सध्याची त्याची दुखापत पाहता तो आगामी रणजी ट्रॉफीत सहभागी होण्याची शक्यता कमीच असल्याचं कळतंय.
Batsman नाही Batter, MCC कडून क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल
ADVERTISEMENT
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर गेलेली असताना कुलदीप तिकडे आपली शेवटची आंतरराष्ट्रीय वन-डे आणि टी-२० मॅच खेळला. यापैकी एका वन-डे आणि टी-२० सामन्यात त्याने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. परंतू उर्वरित सामन्यांत त्याची पाटी कोरीच राहिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT