IPL 2021 : Rashid Khan आणि मोहम्मद नबी उर्वरित हंगामात सहभागी होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान आणि मोहम्मद नबी हे आयपीएलच्या उर्वरित हंगामात सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीनंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. परंतू अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होणार असल्याचं क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं. राशिद खानचा परिवार सध्या अफगाणिस्तानातच अडकला असल्यामुळे तो चिंतेत आहे.

ADVERTISEMENT

परंतू अशा खडतर परिस्थितीतही राशिद आणि मोहम्मद नबी हैदराबाद संघाकडून आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळणार आहेत. सनराईजर्स हैदराबाद संघाचे सीईओ के. षण्मुगम यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल फारशी चर्चा केली नाही, पण राशिद आणि नबी दोघेही युएईत खेळण्यासाठी येणार आहेत.” ३१ ऑगस्टला हैदराबादचा संघ युएईसाठी रवाना होईल.

देशात Taliban ची सत्ता, T-20 World Cup मध्ये सहभागी होणार अफगाणिस्तानचा संघ

हे वाचलं का?

राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान हे तीन अफगाणिस्तानचे खेळाडू सध्या द हंड्रेड या लिगच्या निमीत्ताने इंग्लंडमध्ये आहेत. तालिबान आणि अफगाणिस्तानच्या फौजांमध्ये संघर्ष सुरु असताना राशिद खानने जागतिक नेत्यांना आवाहन करुन संकटकाळात आम्हाला एकटं सोडू नका, हा रक्तपात थांबवा अशी विनंती केली होती. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबुल सोडून पलायन करायचं ठरवल्यानंतर तालिबानने अधिकृतरित्या देशातील सत्तेचा ताबा आपल्या हाती घेतला.

Rashid Khan चा परिवार अडकला अफगाणिस्तानात, Taliban चा राजधानी काबुलवर ताबा

ADVERTISEMENT

क्रिकेटबद्दल काय आहे तालिबान्यांचा दृष्टीकोन?

ADVERTISEMENT

तालिबान्यांनी याआधी क्रिकेटवर बंदी घातली होती. परंतू २००० सालात तालिबानने क्रिकेटला मनोरंजनात्मक खेळाचा दर्जा देत त्यावरची बंदी उठवली. ज्यानंतर अफगाणिस्तानात क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. इतकच नव्हे तर सध्याच्या तरुण पिढीतल्या तालिबानी नेत्यांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता आहे. सध्याच्या घडीला तालिबानी अतिरेकी क्रिकेट संघाला किंवा खेळाडूंना कोणताही धोका पोहचवतील अशी परिस्थिती वरकरणी दिसत नाही.

काबुल आणि इतर भागांवर कब्जा मिळवण्याच्या आधी ज्या भागांवर तालिबानची सत्ता होती तिकडे क्रिकेट जास्त प्रमाणात ऐकलं जायचं. इतकच नव्हे तर तालिबानी शिबीरांमध्ये राहिलेल्या असगर अफगाण सारख्या खेळाडूने स्वतःत सुधारणा करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं होतं.

ज्यावेळी अफगाणिस्तानचा संघ एखादा आंतरराष्ट्रीय सामना जिंकतो त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांमध्ये बंदुकीतून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा केला जातो. इतकच नव्हे तर काही तालिबानी अतिरेकी हे अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची मॅच असेल तेव्हा रेडीओवर ती मॅच ऐकणं, सोशल मीडियावरुन त्याचे अपडेट घेत असतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT