IPL 2021 : SRH मध्ये खांदेपालट, केन विल्यमसन नवा कर्णधार
आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावधीवर येऊन ठेपलेला असताना सनराईजर्स हैदराबादने संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. उर्वरित हंगामासाठी केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादची कामगिरी फार चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांत हैदराबादने फक्त १ सामना जिंकला आहे. हैदराबादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या बदलाची माहिती दिली आहे. टीम मॅनेजमेंट डेव्हिड वॉर्नरचा […]
ADVERTISEMENT
आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यावधीवर येऊन ठेपलेला असताना सनराईजर्स हैदराबादने संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. उर्वरित हंगामासाठी केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादची कामगिरी फार चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांत हैदराबादने फक्त १ सामना जिंकला आहे.
ADVERTISEMENT
हैदराबादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या बदलाची माहिती दिली आहे. टीम मॅनेजमेंट डेव्हिड वॉर्नरचा आदर करतं, संघासाठी त्याचं महत्व किती आहे हे आम्ही जाणून आहोत. उर्वरित हंगामासाठी डेव्हि वॉर्नर त्याच उत्साहाने मैदानात उतरेल अशी आम्हाला खात्री असल्याचं SRH च्या मॅनेजमेंटने स्पष्ट केलंय.
? Announcement ? pic.twitter.com/B9tBDWwzHe
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 1, 2021
दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, संभ्रमाच्या वातावरणामुळे परदेशी खेळाडूंमध्ये निर्माण झालेली बेचैनी पाहता…बीसीसीआयने सीईओ हेमांग अमिन यांनी आठही संघमालकांना विशेष पत्र लिहीलं आहे. या पत्रात प्रत्येक खेळाडूला स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या घरी सुखरुप पोहचवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. खेळाडूच नव्हे तर स्पर्धेसाठीचे कॉमेंट्रेटर्स, अंपायर्स व इतर कर्मचाऱ्यांनाही स्पर्धेनंतर सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल अशी खात्री हेमांग अमिन यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
IPL 2021 : खेळाडूंकडून मदतीचा ओघ वाढला, निकोलस पूरनची Corona विरुद्ध लढ्याला आर्थिक मदत
काय म्हणाले आहेत हेमांग अमिन?
ADVERTISEMENT
तुमच्यापैकी अनेकांना स्पर्धा संपल्यानंतर घरी परत कसं जायचं याबद्दल मनात अनेक शंका आणि प्रश्न असतील. सध्याची परिस्थिती पाहता असे विचार मनात येणं साहजीक आहे. पण तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही, याची खात्री आम्ही देतो. स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही सर्वजण घरी योग्य पद्धतीने सुखरुप पोहचाल यासाठी बीसीसीआय सर्वकाही करेल. सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत, तसेच स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला घरी पोहचवण्यासाठी प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांसोबत आमच्या चर्चा सुरु आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक जण घरी सुखरुप पोहचेपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपलेली नसेल.
ADVERTISEMENT
दरम्यान दोन अंपायर्सव्यतिरीक्त आतापर्यंत जोश हेजलवूड, अँड्रू टाय, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा आणि रविचंद्रन आश्विन या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT