उस्मानाबादच्या राजवर्धनसाठी चेन्नईने लावली ताकद; कोण आहे राजवर्धन हंगरगेकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

19 वर्षाखालील विश्वचषकात आपल्या कामगिरीनं लक्षवेधून घेणाऱ्या जलदगती गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरला संघात घेण्यात चेन्नई सुपरकिंग्जने बाजी मारली. उस्मानाबादचा भूमिपूत्र असलेला राजवर्धनला आता एमएम धोनीसोबत खेळायला मिळणार असून, त्याच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत राजवर्धन हंगरगेकरने उत्कृष्ट प्रदर्शन केलं. त्याच्या या कामगिरीची दखल आयपीएलमुळे घेतली गेली. आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरू असून, राजवर्धन हंगरगेकरला घेण्यासाठी मुंबई इंडियन्सबरोबरच इतर संघही उत्सुक असल्याचं दिसलं.

कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

हे वाचलं का?

राजवर्धनची बेस प्राइस 30 लाख रुपये होती. राजवर्धनसाठी मुंबई इंडियन्सने बोली लावली. मुंबई इंडियन्सने सुरूवात केल्यानंतर लखनऊ सुपर जायंटस् उडी घेतली. लखनऊ पाठोपाठ चार वेळा आयपीएल पटकावणाऱ्या चेन्नईने राजवर्धनला घेण्यासाठी बोली लावली. राजवर्धनला संघात घेण्यात अखेरीस चेन्नईने बाजी मारली. त्यामुळे मूळचा उस्मानाबादचा असलेल्या राजवर्धनला आता धोनीसोबत खेळायला मिळणार आहे.

IPL 2022 Mega Auction: मुंबईची महागडी खरेदी, टामयल मिल्स, टीम डेवीडसाठी मोजली मोठी रक्कम

ADVERTISEMENT

राजवर्धन हंगरेकर कोण आहे?

ADVERTISEMENT

राजवर्धन हंगरगेकर या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचा आहे. राजवर्धन माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू आहे. शिक्षण आणि क्रिकेटसाठी तो पुण्यात गेला. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याच्या जिद्दीने त्याने सातत्य आणि सराव सुरूच ठेवला. 2016-2017 मध्ये राजवर्धनची विजय मर्चंट चषकासाठी निवड झाली होती. त्यानंतर अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली. विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर राजवर्धन आता आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT