IPL 2022 Auction: लिलावादरम्यान कोसळलेले Hugh Edmeades कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या लिलावाला आजपासून बंगळुरुत सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात पहिल्या टप्प्यामध्ये RCB, KKR, RR, PBKS या संघासोबत नवोदीत लखनऊ आणि अहमदाबाद संघांनीही खेळाडूंना विकत घेण्यासाठी रस दाखवला. परंतू लिलावादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सगळ्यांचे धाबे दणाणले. ब्रिटीश ऑक्शनक ह्यू एडमीस हे लिलाव सुरु असताना खाली कोसळले. श्रीलंकेच्या हसरंगावर बोली सुरु असताना हा […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या लिलावाला आजपासून बंगळुरुत सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात पहिल्या टप्प्यामध्ये RCB, KKR, RR, PBKS या संघासोबत नवोदीत लखनऊ आणि अहमदाबाद संघांनीही खेळाडूंना विकत घेण्यासाठी रस दाखवला. परंतू लिलावादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सगळ्यांचे धाबे दणाणले. ब्रिटीश ऑक्शनक ह्यू एडमीस हे लिलाव सुरु असताना खाली कोसळले.
ADVERTISEMENT
श्रीलंकेच्या हसरंगावर बोली सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला. एडमीस खाली कोसळल्यानंतर त्यांना तात्काळ मेडीकल टीमकडे नेण्यात आलं आणि लंच सेशनची घोषणा करण्यात आली. परंतू मिळालेल्या माहितीनुसार एडमीस यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय.
An update from Bengaluru: Hugh Edmeades is stable and should be back when the #IPLAuction resumes at 3.30pm IST https://t.co/p6QhqJn3K6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 12, 2022
जाणून घ्या कोण आहेत ह्यू एडमीस?
हे वाचलं का?
BCCI ने २०१८ साली ह्यू एडमीस यांची आयपीएलच्या ऑक्शनसाठी नियुक्ती केली. याआधी आयपीएलमध्ये ऑक्शनची जबाबदारी १० वर्ष रिचर्ड मेडले सांभाळत होते. एडमीस हे जागतिक दर्जाचे ऑक्शनर असून त्यांनी आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत जगभरात अडीच हजार इव्हेंटमध्ये ऑक्शनरची भूमिका पार पाडली आहे.
क्रिकेटमध्ये लिलावासाठी येण्याआधी एडमीस हे Fine art, Classis cars आणि चॅरिटी ऑक्शनमध्ये सहभागी व्हायचे. आतापर्यंत एडमीस यांनी वस्तू आणि खेळाडू मिळून ३ लाख १० हजारांपेक्षा जास्त गोष्टींचा लिलाव केला आहे.
ADVERTISEMENT
एडमीस यांनी आपण आतापर्यंत केलेल्या लिलावाची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे. एडमीस यांनी आतापर्यंत पेंटीग, फर्निचर, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित संस्मरणीय गोष्टींचा लिलाव केला आहे. २००४ साली एडमीस यांनी ब्रिटीश गिटारिस्ट एरिक क्लॅप्टन यांच्या ८८ गिटारचा लिलाव केला होता, ज्यातून त्यांनी ७४ लाख ३८ हजार ६२४ अमेरिकन डॉलर्सची रक्कम उभी केली होती. २०१६ साली जेम्स बाँडची भूमिका साकारणारा अभिनेता डॅनिअल क्रेगच्या अलिशान Aston Martin DB10 गाडीचा लिलाव करुन २४ लाख ३४ हजार ५०० पाऊंड्सची रक्कम उभी केली होती.
ADVERTISEMENT
आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यासाठी मिळालेली संधी ही एडमीस यांची आतापर्यंत सर्वाच मोठी अचिव्हमेंट मानली जाते.
IPL 2022 : KKR ने सोडवला कॅप्टन्सीचा यक्षप्रश्न? १२ कोटींच्या बोलीवर श्रेयसला घेतलं संघात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT