IPL 2022, MU vs RR : बटलर तळपला! मुंबईला धक्का; राजस्थानची पहिल्या स्थानी झेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स पराभवाची धूळ चारली. जॉस बटलरची शतकी खेळी, हेटमायर आणि संजू सॅमसनने केलेली फटकेबाजी आणि राजस्थानच्या गोलंदाजांनी बजावलेली कामगिरी याच्या बळावर राजस्थानने मुंबई इंडियन्सचा २३ धावांनी पराभव केला.

ADVERTISEMENT

राजस्थानने दिलेल्या १९४ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या अवघ्या १५ धावा झालेल्या असताना कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहितला माघारी पाठवलं.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अनमोलप्रित सिंग आणि ईशान किशनने सावध फलंदाजी करत धावांचा वेग वाढवला. चौथ्या षटकात अनमोलप्रित सिंग बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि ईशान किशनने मुंबईचा डाव सावरला. ईशान किशनने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं (४३ चेंडू ५४ धावा), मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच बोल्टने किशनला बाद केलं.

हे वाचलं का?

तिलक वर्मानेही जबाबदारीने फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिलकने अवघ्या ३३ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. आर. आश्विनने तिलकला त्रिफळाचित केलं. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. पोलार्ड वगळता नंतर आलेल्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईला २० षटकात १७० धावांपर्यंत मजल मारता आली.

राजस्थानकडून सैनी आणि चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

ADVERTISEMENT

संजू ,हेटमायरची झटपट खेळी

ADVERTISEMENT

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानकडून यशस्वी जायस्वाल आणि जॉस बटलर सलामीला आले, मात्र राजस्थानला सुरूवातीलाच धक्का बसला. यशस्वी यादव केवळ एक धाव करून बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलला मिल्सने माघारी धाडले. पडिक्कलला ७ धावा करून बाद झाला. सहा षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि सलामीवीर बटलरने राजस्थानचा डाव सावरला.

डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये बटलरने तुफान फटकेबाजी केली. दुसरीकडे संजू सॅमसन पंधराव्या षटकात धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला पोलार्डने तंबूचा रस्ता दाखवला. सॅमसनने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

या विजयाबरोबरच राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थान सलग दोन विजय मिळवत ४ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा सलग दुसरा पराभव झाला आहे. मुंबईचं नेट रनरेट -१.०२९ असा आहे. तर राजस्थानचा नेट रनरेट २.१०० असा आहे.

सॅमसन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या हेटमायरने नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली. एकीकडून जॉस बटलर मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना हेटमायरनेही षटकार चौकारांची आतषबाजी केली. हेटमायरने अवघ्या १४ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या.

सलामीवीर जॉस बटलरने सुरूवातीपासून आक्रम क पवित्रा घेत मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमणच केलं. जॉस बटलरने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. बटलरने डावातील चौथ्या षटकात दोन चौकार आणि तीन षटकार खेचत तब्बल २६ धावा वसूल केल्या. १९व्या षटकात बुमराहला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न बटलर बाद झाला. मुंबईकडून जसप्रित बुमराह आणि मिल्सने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर पोलार्डने एक बळी घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT