IPL 2022 Mega Auction : आगामी हंगामासाठी BCCI सज्ज, बंगळुरुत ‘या’ तारखेला लिलाव रंगणार?
IPL च्या आगामी हंगामासाठीच्या मेगा ऑक्शनची तयारी बीसीसीआयने पूर्ण केली असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात बीसीसीआय १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरुत आगामी हंगामाचं मेगा ऑक्शन करणार आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी Cricbuzz आणि Cricinfo या वेबसाईटला ही माहिती दिली आहे. या संदर्भात सर्व संघमालकांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. याचदरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे सामन्यांची […]
ADVERTISEMENT
IPL च्या आगामी हंगामासाठीच्या मेगा ऑक्शनची तयारी बीसीसीआयने पूर्ण केली असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात बीसीसीआय १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरुत आगामी हंगामाचं मेगा ऑक्शन करणार आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी Cricbuzz आणि Cricinfo या वेबसाईटला ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
या संदर्भात सर्व संघमालकांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. याचदरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने या मेगा ऑक्शनसाठी भारतातील सर्व सहयोगी क्रिकेट संघटना आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांना आपल्या खेळाडूंची नावं १७ जानेवारीपर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे.
आयपीएलचा आगामी हंगाम हा १० संघांनिशी खेळवला जाणार आहेत. ज्यात अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांचा सहभाग झाला आहे. त्यामुळे या लिलावात १००० खेळाडू सहभागी होतील ज्यात किमान २५० खेळाडूंवर प्रत्यक्ष बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे सर्व संघमालकांना बीसीसीआयने ११ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत बंगळुरुत दाखल होण्यासाठी सांगितलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT