कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलं स्टेडीअम, आता त्यावर होतेय मिरची-भोपळ्याची शेती ! पाहा कुठे घडला हा प्रकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रिकेटचं मैदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती भलीमोठी विस्तीर्ण जागा, खेळपट्टी, सामना पहायला आलेले प्रेक्षक आणि जल्लोष. परंतू याच मैदानावर समजा शेतकऱ्यांनी ताबा मिळवत शेती करायला सुरुवात केली तर?? वाचायला ही गोष्ट विचीत्र वाटत असली तरीही पाकिस्तानाच ही घटना प्रत्यक्षात घडली आहे.

ADVERTISEMENT

भारताप्रमाणे पाकिस्तानातही क्रिकेटला सर्वाधिक पसंती आहे. श्रीलंकेच्या संघावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू कालांतराने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानात येऊन खेळून गेले असून आगामी काळात न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघही इथे खेळायला येणार आहेत. परंतू पंजाब प्रांतात बांधण्यात आलेल्या खानेवाल क्रिकेट स्टेडीअमवर आता चक्क शेती केली जात असल्याचं समोर आलंय.

कोरोना काळात काही महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ब्रेक लागला होता. पाकिस्तानातले आंतरराष्ट्रीय सामने हे कराची आणि लाहोर या दोन शहरांत खेळवले जात आहेत. ARY News ने दिलेल्या माहितीनुसार पंजाब प्रांतातील खानेवाल क्रिकेट स्टेडीअमसाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. स्थानिक खेळाडूंना सरावासाठी जागा मिळावी यासाठी या मैदानात खास सोयही करण्यात आली. परंतू सामने होत नसल्यामुळे आता या भागात स्थानिक शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली असून ते इकडे मिरची, भोपळा अशी पिकं घेत आहेत.

हे वाचलं का?

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत खेळणार आहे. पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात क्रिकेट मालिकेसाठी जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानच्या आणखी काही शहरांमध्ये क्रिकेट सामन्याला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. परंतू सामने होत नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं क्रिकेट स्टेडीअम शेतीसाठी वापरण्यात येत असल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT