Exclusive: 'शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण...' अमित शाहांचं सूचक विधान
'एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत.' असं सूचक विधान अमित शाह यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंनी केलं मोठं विधान

'शिंदेंना नाराज होण्याचं काही कारण नाही, भाजपच्या जास्त जागा'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अजेंडा आज तक 2024 मध्ये मोठं विधान
Amit Shah: नवी दिल्ली: 'एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. 2019 मध्ये देखील आमच्या भरपूर जागा होत्या. परंतु तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलेलं.' असं मोठं आणि अत्यंत सूचक असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. 'अजेंडा आज तक 2024' या विशेष कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी हे विधान केलं आहे. (eknath shinde has no reason to be upset bjp has too many seats amit shah big statement exclusive interview agenda aaj tak 2024)
'शिंदेंनी नाराज होण्याच कारणं नाही', पाहा नेमकं काय म्हणाले अमित शाह
प्रश्न: वर्तमान राजकारणात एवढा मोठा विजय फार कमी वेळा पाहायला मिळतो. मागील 30 वर्षात हे दिसून आलं आहे की, जे लोकसभेत होतं तेच साधारण विधानसभेत होतं. त्यामुळे आपण महाराष्ट्रात आता हा विजय कसा मिळवला?
अमित शाह: '2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना जा जागांवर लढली तिथे आमचे उमेदवार नव्हते. आम्ही तिथे लढलो नव्हतो तर आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्यासोबत तर आमच्या युतीला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्री बनण्याची लालच यामुळे उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला. फक्त आमच्याशीच नव्हे तर महाराष्ट्राने जो जनादेश दिला होता त्याचाशीही विश्वासघात केला होता.'
हे ही वाचा>> Shrikant Shinde: सावरकरांवरून संसदेत राडा.. राहुल गांधी-श्रीकांत शिंदे भिडले, थेट...
'त्यावेळी देखील आम्हाला 2/3 बहुमत होतं आणि आजही आम्हाला 2/3 बहुमत आहे. त्यावेळी आमच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विश्वासघात केला होता. जनतेने ती गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यानंतर आमचं जे अडीच वर्ष सरकार होतं. त्यात आम्ही जी विकासाची कामं केली. याशिवाय मोदी सरकारचा 10 वर्षाचा चांगला कारभार हे देखील आमच्यासाठी जमेची बाजू होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आमचा प्रचंड विजय झालेला आहे.'