रमेश पोवार आणि मिताली राज यांनी आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं – दीप दासगुप्ता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर भारताचा माजी फिरकीपटू आणि मुंबईकर रमेश पोवारची नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी रमेश पोवार यांच्याकडे काही काळासाठी महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती आली होती, त्यावेळी मिताली राज आणि पोवार यांच्यात झालेला वाद चांगलाच रंगला होता. परंतू यानंतर पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पोवार यांची निवड झाल्यामुळे मिताली राज आणि पोवार यांनी आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं असल्याचं मत माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

मराठमोळा रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

२०१८ मध्ये रमेश पोवार यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनल मॅचमध्ये मिताली राजला संघाबाहेर बसवण्यात आलं. ज्यानंतर रमेश पोवार यांच्यावर पक्षपाती पणाचे आरोप झाले होते. मिताली आणि पोवार या दोघांनीही बीसीसीआयला पत्र लिहून एकमेकांवर आरोप केले होते. “त्यावेळी नेमकं काय झालं हे कोणालाच माहिती नाही पण काहीतरी झालं होतं हे नक्की. मिताली वन-डे संघाची कॅप्टन आहे, ती दिग्गज खेळाडू आहे. याबद्दल तुमच्या मनात शंका नसायला हवी. त्यामुळे ज्यावेळी हे दोघंही पुन्हा समोरासमोर येतील तेव्हा पुन्हा वाद होऊ शकतात, म्हणून दोघांनीही फोनवर बोलून आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं आहे.” दीप दासगुप्ता यांनी Sports Today शी बोलताना आपलं मत मांडलं.

हे वाचलं का?

BLOG : चक्रव्युहात अडकलेला टीम इंडियाचा अभिमन्यू

माझ्या मते प्रत्येकाच्या मनात एक भावना सारखीच असणार आहे की भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करावी. त्यामुळे टीम ज्यावेळी पुन्हा एकदा एकत्र येईल त्यावेळी या वादाचा फटका संघाला बसून चालणार नाही, त्यामुळे संघ बॅकफूटला जाईल. एक फोन कॉल करुन दोघांनीही आपापसातले मतभेद दूर करणं गरजेचं आहे. भारतीय महिला संघ आगामी काळात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिकडे दोन्ही संघ कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार. प्रशिक्षक म्हणून रमेश पोवार यांच्यासमोर ही पहिली परीक्षा असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT