महिला क्रिकेटमध्ये मिथाली राजचा डंका, सर्वाधिक रन्स बनवण्याचा विक्रम केला नावावर
भारतीय महिला संघाची कर्णधार मिथाली राजने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंग्लंडच्या शारलट एडवर्डला मागे टाकत मिथाली राज महिला क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत सर्वाधिक रन्स काढणारी क्रिकेटपटू ठरली आहे. मिथाली राजच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये ६६९, वन-डे क्रिकेटमध्ये ७ हजार २४४* तर टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार ३६४ रन्स जमा आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे […]
ADVERTISEMENT
भारतीय महिला संघाची कर्णधार मिथाली राजने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंग्लंडच्या शारलट एडवर्डला मागे टाकत मिथाली राज महिला क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत सर्वाधिक रन्स काढणारी क्रिकेटपटू ठरली आहे.
ADVERTISEMENT
मिथाली राजच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये ६६९, वन-डे क्रिकेटमध्ये ७ हजार २४४* तर टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार ३६४ रन्स जमा आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात नतालिया स्किवर टाकत असलेल्या २३ व्या ओव्हरमध्ये चौकार लगावत मिथालीने हा विक्रम आपल्या नावे जमा केला.
RECORD?: #TeamIndia captain @M_Raj03 is now the LEADING RUN-GETTER in women's international cricket across formats. She goes past England's Charlotte Edwards. ???? pic.twitter.com/XVEEK5ugtV
— BCCI Women (@BCCIWomen) July 3, 2021
याआधी हा विक्रम इंग्लंडच्या शारलट इवर्डच्या नावे जमा होता (१० हजार २७३ रन्स) महिला क्रिकेमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची किमया आतापर्यंत एडवर्ड आणि मिथाली राज या दोन खेळाडूंनीच करुन दाखवली आहे. दरम्यान पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय महिलांनी तिसऱ्या वन-डे सामन्यात इंग्लंडवर मात करत मालिकेचा शेवट गोड केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT