Mohammed Shami ला मोदी सरकारकडून मोठा पुरस्कार जाहीर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mohammed shami arjuna awards chirag shetty rankireddy khel ratn award 2023 sports award player list
mohammed shami arjuna awards chirag shetty rankireddy khel ratn award 2023 sports award player list
social share
google news

Sports Awards Player List Mohammed Shami : यंदाच्या वर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. शमीसह इतर 26 खेळाडूंनाही हा पूरस्कार देण्यात येणार आहे. हे सर्व पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. (mohammed shami arjuna awards chirag shetty rankireddy khel ratna award 2023 sports award player list)

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी प्रथमच मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहेत. हे सर्व पुरस्कार या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : Jagdeep Dhankhar : ‘मी हे 20 वर्षांपासून सहन करतोय’, PM मोदींचा उपराष्ट्रपतींना फोन

समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुरस्कार जाहीर खेळाडूंची नावे

खेलरत्न पुरस्कार

चिराग शेट्टी – बॅडमिंटन
सात्विकसाईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन

अर्जुन अवॉर्ड
ओजस प्रवीण देवतळे – तिरंदाजी
अदिती गोपीचंद स्वामी – तिरंदाजी
श्रीशंकर – अ‍ॅथलेटिक्स
पारुल चौधरी – अ‍ॅथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट
अनुष अग्रवाल – घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग – अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर – गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
सुशीला चानू – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – शूटिंग
ईशा सिंग – शूटिंग
हरिंदर पाल सिंग – स्क्वॉश
अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अंतिम – कुस्ती
रोशिबिना देवी – वुशू
शीतल देवी – पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok sabha Election 2024 : कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

दरम्यान आता 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातील. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT