Team India : ‘मोदी त्यांच्या बेडरूम किंवा बाथरूमध्ये…”, माजी क्रिकेटपटू पंतप्रधानांवर का संतापला?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pm narendra modi dressing room video kirti azad criticized ind vs aus final 2023
pm narendra modi dressing room video kirti azad criticized ind vs aus final 2023
social share
google news

Kirti Azad Criticize Pm Narendra Modi dressing room Video : वर्ल्ड कप सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) 6 विकेट राखून टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचे सात्वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला होता. पंतप्रधान मोदींच्या या कृतीवर आता 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू किर्ती आझादने आक्षेप घेतला आहे. नेमकं आता किर्ती आझादने (Kirti Azad) काय आक्षेप घेतलाय हे जाणून घेऊयात. (pm narendra modi dressing room video kirti azad criticized ind vs aus final 2023)

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांचा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किर्ती आझाद यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला होता. ड्रेसिंग रूम ही कोणत्याही संघासाठी गाभाऱ्यासारखी असते.आयसीसी त्या ठिकाणी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ शिवाय कुणालाही प्रवेश देत नाही असे, किर्ती आझाद यांनी म्हटलं आहे.पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूमच्या बाहेर खेळाडूंची भेट घेतली पाहिजे होती. हे मी एक राजकारणी म्हणून नव्हे तर एक खेळाडू म्हणून सांगतो आहे, असेही आझाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा : MLA Disqualification: जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी..

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बेडरूममध्ये, ड्रेसिंग रूममध्ये किंवा बाथरूममध्ये समर्थकांना अभिनंदनासाठी किंवा सात्वन करण्यासाठी आल्यास परवानगी देतील का? असा सवाल आझाद यांनी यावेळी केला. तसेच खेळाडू हे राजकिय नेत्यांपेक्षा अनेक पटीने शिस्तप्रिय असतात, असे आझाद म्हणाले आहेत.

हे ही वाचा : बागेश्वर बाबाच्या दरबारात भाविकांना मारहाण, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येते आहे. यावरून राजकारण होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या आरोपांवर आझाद यांनी भाजपवर पलटवार केला आहे. 1983 चा वर्ल्ड कप जिंकूण देणारा संघ त्याच्या कर्णधार कपिल देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रणच देण्यात आले नाही. आता सांगा कोण राजकारण करतंय? असा सवाल आझाद यांनी केला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT