MLA Disqualification: जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी.. - in hearing held in legislature in shiv sena mla disqualification case there was a fierce fight between shinde and thackeray group lawyer mla sunil prabhu adv jethmalani - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

MLA Disqualification: जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी..

Shiv sena: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही बाजूकडून कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत. पण याचवेळी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी सुनावणी दरम्यान आपला मराठी बाणाही दाखवला. वाचा या संपूर्ण सुनावणीत नेमकं काय घडलं (in hearing held in legislature in shiv […]
in hearing held in legislature in shiv sena mla disqualification case there was a fierce fight between shinde and thackeray group lawyer mla sunil prabhu adv jethmalani

Shiv sena: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही बाजूकडून कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत. पण याचवेळी ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी सुनावणी दरम्यान आपला मराठी बाणाही दाखवला. वाचा या संपूर्ण सुनावणीत नेमकं काय घडलं (in hearing held in legislature in shiv sena mla disqualification case there was a fierce fight between shinde and thackeray group lawyer mla sunil prabhu adv jethmalani)

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर आमदार अपत्रातेची सुनावणी, वाचा जे घडलं ते जसंच्या तसं

ठाकरे गटाकडून पुरावे सादर केले जात आहेत

शिंदे मुख्यमंत्री झाले याच्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्या.

व्हीप कोणाचा आहे याबाबतचा मेल

अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र

हे सगळे पुरावे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले.

ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले पुराव्यांची नोंद अध्यक्ष करून घेत आहेत

सुनील प्रभू यांनी सादर केलेल्या पुराव्यांची माहिती ठाकरेंचे वकील देत होते.

शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की सुनील प्रभू यांनी माहिती द्यायला हवी

प्रभू मराठीमध्ये महिती देत होते त्यावर ते ट्रान्सलेट करण्यासाठी वेळ जाईल असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलं.

यात सुनावणीचा वेळ जात असल्याचं कामत म्हणाले

प्रभू हे साक्षीदार आहेत आणि ठाकरे गटाचे वकील त्यांना डिक्टेकट करत आहेत असा आक्षेप शिंदे गटाकडून घेण्यात आला.

त्यावर मी दुपारनंतर साक्षीदाराला वेगळीकडे बसण्याची व्यवस्था करेन असं अध्यक्ष म्हणाले.

शिंदे गटाकडून कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेण्यात येतोय त्यामुळे त्यांच्याकडून काय आक्षेप घेतले जात आहेत ते कळण्यासाठी आणि ते रेकॉर्डवर येण्यासाठी या सुनावणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, कामत यांची मागणी.

कामत यांची मागणी अध्यक्षांनी फेटाळली, सगळं रेकॉर्डवर जात आहे असं अध्यक्षांकडून सांगण्यात आलं

ठाकरे गटाचे वकिल साक्ष वाचून दाखवत आहेत. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे.

त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे.

सुनिल प्रभू यांनी दिलेल्या साक्षीप्रमाणे संबंधित पुराव्यांची कागदपत्रे सादर करत आहेत

शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट

हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले जात आहे

कामत आणि साखरे यांच्यात खडाजंगी

ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली affedevit रेकॉर्डवर कशी घेतली जाऊ शकतात असा आक्षेप शिंदेंच्या वकिलांकडून घेण्यात आला, त्यावर नंतर चर्चा करता येईल असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलं.

यावरून कामत आणि साखरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली

वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीकाटिप्पणी वरून अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा

महेश जेठमलानी व देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीकाटिप्पणी नंतर अध्यक्षांकडून नाराजी

शिंदे गटाने पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत ते बंद दारामागे होऊ नये. आणि अध्यक्षांनी त्यावर काय रुलिंग दिलं ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावं, कामत यांची मागणी

21 जून 22 ला मनोज चौघुले यांनी प्रभाकर काळे जे शिंदे यांचे पीए आहेत यांना पाठवलेला वॉट्सअप मेसेज रेकोर्डवर घेण्यात आला.

मुंबईतील शिवसेना विभाग प्रमुख यांचे उद्धव ठाकरे यांना दिलेल्या समर्थनचे affidavit रेकॉर्डवर घेण्यात आले.

2 जुलै 22 रोजी इमेल द्वारे व्हीपबाबतचा पाठवलेल्या आदेशाची कॉपी रेकोर्डवर घेण्यात आली.

सुनील प्रभू यांची आता शिंदे गटाकडून उलट तपासणी सुरू

मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची प्रभू यांची मागणी

जेठमलानी – तुम्ही आमदार अपत्रतेबाबत याचिका या इंग्लिशमध्ये दाखल केले हे सत्य आहे का?

प्रभू – हो मी इंग्लिश मध्येच याचिका दाखल केली आहे. मी वकिलांना हिंदी आणि मराठीमध्ये सांगितलं. मी त्यांना याचिकेत काय लिहायचं ते सांगितलं. त्यांनी ही याचिका इंग्रजीमध्ये मांडली त्यांनतर मी समजून घेतल्यावर मी त्यावर सही केली.

जेठमलानी – तुम्ही अपत्रात याचिकेमध्ये असं कुठंही म्हटलं नाही की, तुम्ही या याचिकेत जे लिहिलं आहे ते तुम्हाला मराठीमध्ये समजावण्यात आलं आहे.

प्रभू – मी जे काही बोललो ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी – तुम्ही व्हेरिफिकेशन क्लॉजमध्ये देखील तुम्ही कुठेही म्हटलं नाही की, याचिकेत जे म्हटलं आहे ते तुम्हाला समजावून सांगण्यात आलं.

प्रभू – मी आधीच म्हणालो आहे की याचिकेत जे लिहिलं आहे ते मला समजावून सांगितलं तेव्हाच मी यावर सही केली.

जेठमलानी – तुम्हाला इंग्लिश वाचता येतं का आणि समजतं का?

प्रभू – मी इंग्लिश वाचू शकतो आणि ते मला कळतं, पण मी माझ्या भाषेत वाचतो आणि लिहितो तेव्हा मला जास्त अर्थ प्राप्त होतो.

जेठमलानी – तुमच्या वकिलांनी अपात्र याचिका तुम्ही सही करण्यापूर्वी इंग्लिशमध्ये वाचून दाखवली का?

प्रभू – मला इंग्लिशमध्ये वाचून दाखवण्यात आली, मी त्याचा शब्दश: मराठीमध्ये अर्थ समजून घेतला.

जेठमलानी – तुम्हाला कुठल्या वकिलांनी याचिकेतील मुद्दे मराठीमध्ये समजावले?

प्रभू – अॅड असीम सरोदे

जेठमलानी – 18 नोव्हेंबर 23 ला जे तुम्ही शपथपत्र दिलं इंग्लिशमध्ये आहे का?

प्रभू – हो

प्रश्न – तुमच्या शपथपत्रामध्ये तुम्ही कुठेही म्हटलं नाही की, हे तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगण्यात आलं.

उत्तर – ते रेकॉर्डवर आहे

जेठमलानी – तुम्हाला शपथपत्र न समजावत सही केली आहे.

प्रभू – हे शक्य नाही, मी आमदार आहे.. 2 ते 3 लाख लोकांनी निवडून दिलं आहे. मी माझ्या भाषेत समजावून घेतलं आणि मग सही केली.

याचिकेतील मधील एका पॅरावर जेठमलानी यांनी प्रश्न विचारला

त्यावर मला मराठीमध्ये याचं भाषांतर द्या, अशी मागणी प्रभू यांनी केली.

त्यावर अध्यक्ष यांनी प्रभू यांना पॅरा मराठीमध्ये समजावून सांगितला.

जेठमलानी – तुम्ही तुमच्या शपथपत्रात अस म्हटलं आहे की, तुम्ही 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलात. तुम्ही 19 ला भारतीय जनता पक्षाच्या युतीत लढलात हे खरं आहे का?

प्रभू – मला शिवसेना पक्षाने ab फॉर्म दिला, त्यावर मी निवडणूक लढलो.

कामत यांनी प्रश्नांवर आक्षेप घेतला

ज्या प्रश्नांची उत्तरं ही सर्वश्रुत आहेत. असे प्रश्न विचारून सुनावणीचा वेळ वाया घालवला जातोय.

जेठमलानी – तुम्हाला शिवसेना पक्षाने दिंडोशी मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं होतं त्या शिवसेना पक्षाने निवडणूकपूर्वी भाजपसोबत युती केली होती हे सत्य आहे का?

प्रभू – सत्य आहे.

नार्वेकर यांनी आक्षेप फेटाळला

सुनावणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं अशी पुन्हा मागणी कामत यांनी केली, त्यावर नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली

जेठमलानी – 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात एनसीपी आणि काँग्रेसवर तुम्ही हल्ला चढवला नाही?

ठाकरे गटाकडून हल्ला शब्दावर आक्षेप… त्यावर जेठमलानी बरसले… हे आक्षेप अनाकलनीय आहेत.

प्रभू : मी माझ्या मतदारसंघात केलेल्या विकास कामावर लढलो… त्यामुळे मला त्यांच्यावर हल्ला किंवा आरोप करण्याची वेळच आली नाही.

जेठमलानी : हे प्रश्नाचे उत्तर नाही… कुठलाच हल्ला केला नाही? हो किंवा नाही?

प्रभू : मी माझ्या विरोधकांवर हल्ला करण्याची वेळच आली नाही… मी विकासकामांवर प्रचार केला..

प्रभू : मी आचारसंहितेचे पालन केले.. मला माझ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारावर बोलण्याची वेळच आली नाही.

जेठमलानी : जर उत्तर नाही असेल तर तसं स्पष्ट करावं.. मग आम्ही संबंधित पुरावे सादर करू.

जेठमलानी : आपण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान बीजेपी शिवसेनेच्या शासनाने केलेल्या कामाबद्दलचा उल्लेख केलात का?

प्रभू : मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाबद्दलचा उल्लेख केला

अध्यक्ष : पुन्हा तोच प्रश्न आहे कि शासनाच्या कामाचा उल्लेख केला?

प्रभू : शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून जी कामं केली आणि जी करायची आहेत त्याचा उल्लेख केला

जेठमलानी : प्रचारादरम्यान तुम्ही पीएम मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो पोस्टर्सवर प्रचारासाठी वापरले का?

प्रभू : मला आता आठवत नाही, कोणाचे फोटो होते पण त्यावेळेस आम्ही युतीत होतो त्यामुळे जे फोटो वापरायचो तेच वापरलेत… पण त्या पोस्टरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा नक्की होते..

जेठमलानी – आपण याचिकेच्या दुसरा परिच्छेदमध्ये भाजप आणि इतर भ्रष्ट आणि इतर हेतूने चुकीचा प्रभाव व इतर गैरकानुनी माध्यमातून करत होते असा आपण आरोप केला हा कशाच्या आधारावर केला आहेसुनील प्रभु – 2019 शिवसेना , राष्ट्रवादी आणि कांग्रेस यांचं सरकार स्थापन केलं
– त्यावेळी प्रतिवादी आमच्या सोबत मंत्री होते
– त्यानंतर हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्यावेळी ते चुकीच्या पद्धतीने गेले असे मी म्हटलं आहे

जेठमलानी – प्रश्न क्रमांक 20 मध्ये तुम्हाला त्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागात विचारलं होतं की, आपण जे वक्तव्य केले त्याचा ठोस पुरावा आहे का? ( भाजपने गैरप्रकार केला )

प्रभू – ते सगळं रेकोर्डवर आहे.

जेठमलानी – तुमच्या 22 व्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यावरून हे दिसतं की संविधान आणि देशातील न्याय व्यवस्थेबाबत मान नाही.

प्रभू – असं म्हणण गैर आहे की मी घटनेचा किंवा संविधानाचा अपमान केला. मी लोकशाहीचा आदर करतो. घटना बाबासाहेबांनी लिहिली त्यामुळे माझ्यासारखा माणूस आमदार झाला. मला संविधानाबाबत प्रेम आहे, आदर आहे. संविधानाला अपमानित होणारं कुठलंही वक्तव्य होणार नाही.

प्रभू यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला त्याचा उल्लेख अध्यक्षांनी इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये घेतला नाही त्यावर कामात यांनी आक्षेप घेतला. बाबासाहेबांचा उल्लेख का नाही घेतला ट्रान्सलेशनमध्ये? असा प्रश्न कामत यांनी घेतला, त्यावरून अध्यक्ष आणि कामात यांच्यात खडाजंगी झाली.

अध्यक्ष व्यवस्थित ट्रान्सलेशन करत नाहीत असं म्हणत कामत यांनी योग्य ट्रान्सलेशन करणाऱ्या व्यक्तीला घ्यावं अशी मागणी केली.

कामत यांनी प्रभू यांनी लीड करू नये असं नार्वेकर म्हणाले त्यावर कामत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जेठमलानी – मी व्हेरिफिकेशन क्लॉज 1 चा उल्लेख करतोय. यात तुम्ही म्हंटलं की यातील माहिती रेकॉर्डवर आहे. कुठल्या रेकॉर्डवर आहे ते तुम्ही स्पष्ट करा

प्रभू – ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी – तुमच्या 18 नोव्हेंबर 23 च्या affedevit मध्ये तुम्ही कुठलही करप्शन झालं याचा उल्लेख केला नाही.

प्रभू – रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी – माझं असं म्हणणं आहे की अपात्र याचिकेत पॅरा 2 मध्ये जे आरोप केले ते आरोप 18 नोव्हेंबर 23 च्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केला नाही. कारण हे आरोप खोटे आहेत याची तुम्हाला कल्पना होती.

प्रभू – मी जे खरं आहे ते affedevit मध्ये मांडलं आहे. त्यामुळे मी शपथेवर खोटं बोलण्याचा प्रश्न नाही.

ट्रान्सलेशनमध्ये अनेक गोष्टी राहत असल्याने प्रभू यांचं म्हणणं मराठीमध्ये रेकॉर्ड करण्याची मागणी कामत यांनी केली.

मराठीमध्ये रेकॉर्ड करण्याची मागणी कामत यांनी लावून धरली

प्रभू यांचं म्हणणं मराठीमध्ये रेकॉर्ड करायचं की इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं यावरून बराच वेळ युक्तिवाद सुरू आहे.

काय लिहिलं जातंय हे प्रभू यांना दिसेल याची व्यवस्था करण्याची ठाकरे गटाची मागणी

आता प्रभू यांना काय रेकॉर्डवर घेतलं जातंय हे दिसावं याची व्यवस्था करता येईल का याबाबत खल सुरू आहे

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. सुनील प्रभू मराठीत उत्तर देत असताना त्याचं इंग्रजी भांषातर शब्दशः होत नसल्याचं कामत यांचं म्हणणं. अध्यक्षांनी साक्षीदरम्याम हस्तक्षेप केल्याने कामत यांना साक्षीदाराला प्रभावित करत असल्याचं म्हटलं. यावरून कामत चिडले आणि म्हणाले माझ्या संपूर्ण करिअरमध्ये कोणीही माझ्यावर हा आरोप केला नाही की मी साक्षीदाराला प्रभावित करतोय.

मराठीत साक्ष, त्याचं इंग्रजीत भाषांतर आणि भाषांतर faithful केलं जात नसल्याने सुनावणी दरम्यान गोंधळ

नार्वेकर – पहिल्यांदाच आमदार अपात्र प्रकारणासाठी अशी व्यवस्था केली असेल

जेठमलानी – तुम्ही 23 (जून 2022) तारखेला याचिका दाखल केली. यात तुम्ही म्हटलं आहे की ते तुमच्या संपर्कात नव्हते. माझं म्हणणं आहे की, 21 (जून 2022) तारखेला उद्धव ठाकरे यांच्याकडून गेलेले दूत एकनाथ शिंदे यांना भेटले होते. मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी एकनाथ शिंदे गटाची भेट घेतली होती. तुम्ही सहमत आहात का?

सुनील प्रभू – नार्वेकर यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली मला माहीत नाही

जेठमलानी – याचिकेचा पॅरा 3 बघा, त्यात तुम्ही म्हटलं की, एकनाथ शिंदे तुमच्या संपर्कात नव्हते. पण 21 जून 2022 रोजी ठाकरे यांचे 2 राजदूत, मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक जे सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते, त्यांची समजूत काढण्यासाठी हे तुम्हाला मान्य आहे का?

प्रभू – शिंदे संपर्कात येत नव्हते हे खरं आहे. पण फाटक आणि नार्वेकर यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे मला माहीत नाही.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

या दिवसभरातील खडाजंगीनंतर आजची सुनावणी संपली. आता उर्वरित सुनावणी ही उद्यापासून 3 दिवस सलग होणार आहे. त्यानंतर 25 , 26 , 27 सुट्टी असणार आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत सलग सात दिवस सुनावणी चालणार आहे.

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग