'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?

मुंबई तक

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना आयकर नोटीस मिळाल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. पण आता शिरसाट यांनी हे वक्तव्य मागे घेतले आहे.

ADVERTISEMENT

श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस
श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुति आघाडीतील शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज (10 जुलै) विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांनी दावा केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परंतु काही वेळातच शिरसाट यांनी घूमजाव करत हे वक्तव्य चुकीने आपल्या तोंडी घातलं गेलं असं म्हटलं. पण संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले 

वक्तव्य आणि घूमजाव 

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मला नोटीस आलीए, श्रीकांत शिंदेंना नोटीस आलीए.. आणखी कोणाला नोटीस येत असेल.. तर त्याबाबत आयकर विभागाला उत्तर देणं हे बंधनकारक आहे. आयकर खात्याने 9 तारखेला माझ्याकडे उत्तर मागितलं होतं. पण मी त्यांच्याकडे वेळ वाढवून मागितली आहे.'

या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. शिवसेना सत्तेत असतानाही त्यांच्या मंत्र्यांना आणि खुद्द एकनाथ शिंदेंच्या मुलाला आयकर खात्याची नोटीस आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

हे ही वाचा>> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...

मात्र, काही वेळातच संजय शिरसाट यांनी घूमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "मी श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याबाबत काहीच बोललो नाही. काही पत्रकारांनी मला विचारले की, श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली आहे का? तेव्हा मी सांगितले की, मला याबाबत काही माहिती नाही. माझ्या तोंडी चुकीचे वाक्य घातले गेले."

हे वाचलं का?

    follow whatsapp