खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले

मुंबई तक

Iran Supreme Leader Khameini Death : मध्य-पूर्वेतील युद्धाने अत्यंत भीषण वळण घेतले असून इस्त्राईल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Iran Supreme Leader Khameini Death
Iran Supreme Leader Khameini Death
Google CTA

बातम्या हायलाइट

point

खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...

point

इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले

Iran Supreme Leader Khameini Death : मध्य-पूर्वेतील युद्धाने अत्यंत भीषण वळण घेतले असून इस्त्राईल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेच्या 14 लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात शेकडो अमेरिकन सैन्य मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.

हे ही वाचा : घरात घुसून वहिनीवर चाकूने वार केले अन् काही तासांतच झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिराचा मृतदेह... नेमकं काय घडलं?

खामेनींच्या कुटुंबियांचा शेवट

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केवळ खामेनीच नव्हे, तर इराणमधील 40 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडून टार्गेट करण्यात आले आहे. यामध्ये खामेनी यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी, नात, जावई मोहतबा खामेनी आणि सून जहरा हद्दाद अदेल यांचाही मृत्यू झाला आहे.

हल्ल्यात मारले गेलेले इराणी अधिकारी

मोहम्मद पकपूर : या हल्ल्यात खामेनी यांचे विश्वासू आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर मोहम्मद पकपूर हे ठार झाले आहेत. कट्टरपंथीय असलेले पकपूर यांना खामेनी यांनीच पुढे आणले होते.