प्रेयसीनं अबोला धरला, प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर
Crime News : प्रेयसीने अबोला धरल्याने एका तरुणाने तिच्यासमोर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या प्रेयसीशी बोलण्याच्या हट्टापायी हा तरुण तब्बल 370 किलोमीटरचा प्रवास करून तिला भेटण्यासाठी पोहोचला. मात्र, प्रेयसीने बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या डोळ्यांदेखत स्वतःवर गोळी झाडून स्वत:ला संपवले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीनं अबोला धरला
प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर
Crime News : प्रेयसीने अबोला धरल्याने एका तरुणाने तिच्यासमोर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या प्रेयसीशी बोलण्याच्या हट्टापायी हा तरुण तब्बल 370 किलोमीटरचा प्रवास करून तिला भेटण्यासाठी पोहोचला. मात्र, प्रेयसीने बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या डोळ्यांदेखत स्वतःवर गोळी झाडून स्वत:ला संपवले. निखिल आहके असं या मृत तरुणाचं नाव आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात शनिवारी (28 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.
हे ही वाचा : जळगाव : प्रेम संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःलाही संपवलं, मुलीनं दार उघडून पाहताच...
स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास
निखिलचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, ज्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. ती तरुणी दोन दिवसांपूर्वीच उज्जैनमधील आपल्या मोठ्या बहिणीकडे आली होती. निखिल आपल्या प्रेयसीशी बोलण्यासाठी इतका व्याकुळ होता की, तो आपली स्कूटी घेऊन तो त्याच्या गावातून थेट उज्जैनला पोहोचला. या दोन ठिकाणांमध्ये 370 किलोमीटरचं अंतर आहे. शनिवारी सायंकाळी 5:30 ते 6:00 च्या सुमारास तो तरुणीच्या बहिणीच्या घरात शिरला. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, घरात शिरताच निखिलने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीची मोठी बहीण आणि मुलाला एका खोलीत कोंडले आणि तरुणीकडे बोलण्याचा हट्ट धरला. 'तुझी बहीण माझ्याशी बोलत नाहीये, तिला माझ्याशी बोलायला सांग,' असे तो ओरडून सांगत होता.
बोलणार नाही म्हणताच झाडली गोळी
जेव्हा तरुणीने त्याच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले, तेव्हा निखिल घराच्या अंगणात गेला. तिथे त्याने आपल्याकडे असलेल्या पिस्तुलने थेट स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.










