राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी', नवी ऑफरही देऊन टाकली
Maharashtra Politics : काँग्रेस प्रभारी Ramesh Chennithala यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती करत त्याबदल्यात विधान परिषदेतील रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना 'फोनाफोनी'
नवी ऑफरही देऊन टाकली
Maharashtra Politics : राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर दावा ठोकल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवर आपले संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी ही जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रभारी Ramesh Chennithala यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती करत त्याबदल्यात विधान परिषदेतील रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आला आहे.
काँग्रेसच्या मते, या तडजोडीमुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी मजबूत राहील, तर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची एकजूट टिकवण्यास मदत होईल. मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Sharad Pawar काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : धाराशिव : काकाने पुतणीला गळा दाबून संपवलं, कोयत्याने तुकडे करुन मृतदेह चारीमध्ये पुरला, हत्येचं कारणही समोर
राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचं गणित नेमकं काय?
या सगळ्यामागे स्पष्ट राजकीय गणित आहे. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असून, विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 10 टक्के म्हणजेच 25 सदस्य असणे आवश्यक आहे. सध्या काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. मात्र यावर्षी होणाऱ्या 72 जागांच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या निवडणुकांनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला आहे. 16 मार्च रोजी 37 जागांसाठी, 24 जून रोजी 24 जागांसाठी आणि 11 नोव्हेंबर रोजी 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.










